दावोस - महाराष्ट्राने वर्ल्ड इकोनॉमी फोरमध्ये ६१ करार केले. त्यात १५ लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली. १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. इन्फ्रास्क्ट्रक्चर, ग्रीन एनर्जी, सोलार, फायनान्स, लॉजेस्टिक, इंटरटेनमेंट, आयटी, स्टील, डेटा सेंटर, शिक्षण, संरक्षण, ऑटो, इलेक्ट्रिक, ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगसह अनेक क्षेत्रातील करार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच भागात ही गुंतवणूक येणार आहे. MMR विभागात जवळपास ६ लाख कोंटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या सगळ्याच क्षेत्रात MOU झालेत. विदर्भात ५ लाख कोटी गुंतवणुकीचे करार, उत्तर महाराष्ट्रात ३०-३५ हजार कोटींचे गुंतवणूक करार, मराठवाड्यात चांगले MOU झालेत. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मराठवाडा नवीन क्षेत्र म्हणून विकसित होतंय. गडचिरोलीतही मोठी गुंतवणूक आपल्याला मिळाली आहे. ९८ टक्के गुंतवणूक थेट FDI च्या माध्यमातून होत आहे. परदेशी गुंतवणुकीमुळे राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी सुरुवात केली होती, मागच्या वेळी जे करार झाले त्यातील अनेक करार मार्गी लावू शकलो आहोत. इतर राज्यांच्या कराराच्या तुलनेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा आनंद आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच दावोस हे जागतिक नेटवर्किंगचे केंद्र आहे. जगभरातील सीईओ वर्ल्ड इकोनॉमी फोरमनिमित्त इथं असतात. ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत आपण करार केलेत, त्यांची इच्छा असते आमचे जे फॉरेन पार्टनर आहेत ते आपल्या करारावेळी उपस्थित असले पाहिजेत, त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र दावोसला येतात. त्यामुळे हे करार दावोसमध्ये होतात. मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून आपली ताकद दाखवतो. नेटवर्किंक फोरममधून सगळे एकमेकांना भेटतात. गुंतवणूकदार एकत्र येतात त्यामुळे दावोस हे केंद्र म्हणून पुढे येत आहे. भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते त्याचे द्योतक हे करार आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, देशभरात MOU चं प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे याचे प्रमाण ४० टक्के आहे. राज्यात ६०-६५ टक्के प्रमाण आहे. डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्र कॅपिटल होतंय. ऑईलपेक्षा जास्त किंमत डेटाची झाली आहे. डेटा सेंटर कॅपिटल महाराष्ट्र झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात राज्य पुढे जाणार आहे. महाराष्ट्राला १५ लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक मिळाल्यानंतर काही लोकांना आनंद होत नसेल तर त्याचा इलाज नाही. आपण जे काही करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय. ज्यांनी वेगवेगळे ट्विट केले त्यांना फार उत्तर द्यायची गरज नाही. इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रात गुंतवणूक येतेय त्याचा आनंद आहे असं सांगत मुख्यमंत्री फडणवीसांनी दावोस दौऱ्यावरून टीका करणाऱ्यांना टोला लगावला. एक'भारत' म्हणून भूमिका मांडली
उद्योग मंत्र्यांनीही स्वत:लक्ष घालून सगळे करार व्यवस्थित झाले पाहिजेत हे पाहिले. महाराष्ट्रासाठी आज चांगला दिवस आहे. इंडिया पॅव्हेलियनमध्ये अनेक राज्य आले परंतु त्यात बोलबाला महाराष्ट्राचा होता. राज्यातील जनतेने ही संधी दिल्याने आम्ही या गोष्टी करू शकलो. ज्या ६ राज्यांना दावोसच्या संमेलनाला येण्याची संधी मिळाली त्यात महाराष्ट्राचा समावेश होता. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दावोसमध्ये आर्टिफिशयल इंटेलिंजेस ही थीम होती. त्यावर खूप चर्चा दावोसमध्ये झाली. ट्रम्प यांच्या विजयानंतर तिथलं प्रशासन आणि भारताची या २ चर्चा सर्वाधिक झाल्या असं इथली लोक म्हणत होती. त्यामुळे भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रचंड उत्सुकतेचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला जे नेतृत्व मिळवून दिले त्याचे प्रत्यंत्तर आम्हाला पाहायला मिळाले. सहा राज्याचे आम्ही मुख्यमंत्री असलो, वेगळ्या पक्षाचेही होते परंतु आम्ही सर्वांनी एक भारत म्हणून आमची भूमिका मांडली असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.