शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

१६ अ‍ॅटर्नी जनरल्सचे ट्रम्पना आव्हान

By admin | Updated: February 8, 2017 01:27 IST

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवासी बंदी निर्णयाच्या निषेधार्थ देशात विरोध होत असताना आता १६ अ‍ॅटर्नी जनरल यांनी एकजूट

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवासी बंदी निर्णयाच्या निषेधार्थ देशात विरोध होत असताना आता १६ अ‍ॅटर्नी जनरल यांनी एकजूट दाखवत याविरुद्ध आवाज उठविला आहे. मुस्लिमबहुल सात देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदीचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला आहे. हा निर्णय भेदभावाचा आणि घटनाबाह्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सूदान, सीरिया आणि यमन या सात देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. ट्रम्प यांनी या शासकीय आदेशावर स्वाक्षरीही केली. पण, सिएटलच्या एका न्यायालयाने या आदेशाच्या अंमलबजावणीवर अस्थायी स्वरूपात स्थगिती आणली आहे. ट्रम्प प्रशासनाने या निर्णयाला सर्किट कोर्ट आॅफ अपिल्समध्ये आव्हान दिले आहे. तर, १६ राज्यांच्या अ‍ॅटर्नी जनरल यांनी या शासकीय आदेशाच्या विरुद्ध न्यायमित्रांची बाजू दाखल केली आहे. पेनसिल्व्हेनियाचे अ‍ॅटर्नी जनरल जोश शापिरो म्हणाले की, ही याचिका आमच्या समुदायाला सुरक्षित ठेवण्यासाठी, अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी आणि कायद्याचे शासन कायम ठेवण्यासाठी आहे. तर, मेसाच्युसेट्सच्या अ‍ॅटर्नी जनरल श्रीमती माउरा हेले म्हणाल्या की, कोणतेही अध्यक्ष वा प्रशासन आमच्या कायद्यापेक्षा व घटनेपेक्षा शक्तिशाली नाहीत.राज्याचे अ‍ॅटर्नी जनरल असल्यामुळे आमचे हे कर्तव्य आहे की, आम्ही या प्रशासनाला अधिक जबाबदार बनवू. या प्रयत्नात आम्ही एकजूट आहोत. न्यूयॉर्कचे अ‍ॅटर्नी जनरल एरिक श्ेइनरमन यांनी या बंदीला घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि गैरअमेरिकी असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा सरकारी प्रस्ताव रद्द करण्याची मागणी न्यायमित्रांनी केली आहे. अ‍ॅटर्नी जनरल यांनी असे म्हटले आहे की, या आदेशामुळे देशातील विद्यापीठांचे मोठे नुकसान होत आहे. जे विद्यापीठे जगातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर अवलंबून आहेत त्यांचे मोठे नुकसान होत आहे. (वृत्तसंस्था)रशियाने व्यक्त केला संतापमॉस्को : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाखतीदरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना उद्देशून खुनी या शब्दाचा वापर केल्यामुळे रशियामध्ये संताप व्यक्त होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची मुलाखत काही दिवसांपूर्वी फॉक्स न्यूजवर प्रसारित करण्यात आली होती. त्यात फॉक्स न्यूजचे मुलाखतकर्त्याने पुतीन यांना खुनी म्हटले होते. त्यामुळे फॉक्स न्यूजने माफी मागावी, अशी मागणी रशियाने केली आहे. फॉक्स न्यूजचे मुलाखतकर्ते बिल ओ राइली यांनी ट्रम्प यांची मुलाखत घेताना, पुतीन यांचा उल्लेख खूनी ‘अ किलर’ असा केला होता. पुतीन यांचा उल्लेख खुनी असा करण्यामागे काय कारण होते, याचे स्पष्टीकरणही मुलाखतकर्त्यांने त्या वेळी दिले नव्हते. तुम्ही पुतीन यांचा आदर, सन्मान करतात का? असा प्रश्न राइली यांनी विचारला. त्यावर त्यावर ट्रम्प यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर, पुन्हा पुतीन हे खुनी आहेत, तरी तुम्ही त्यांचा आदर, सन्मान का करता? असा प्रश्न राइली यांनी विचारला. त्या प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प यांनी आपल्याकडेही (अमेरिका) बरेच खुनी आहेत. आपला देश निर्दोष आहे, असे तुम्हाला वाटते की काय? असा प्रतिसवाल ट्रम्प यांनी केला होता. फॉक्स न्यूजने वापरलेले शब्द अवमानकारक आहे. ही भाषा सहन केली जाणार नाही, असे रशियाने म्हटले आहे. प्रतिष्ठित मानली जाणारी फॉक्स न्यूज ही वृत्तवाहिनी माफी मागेल, अशी अपेक्षाही रशियाने व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)