शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

१५ अतिरेक्यांचा केला खात्मा, अमेरिकेकडून मोठी कारवाई, इराकच्या अनबर वाळवंटात संयुक्त मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 11:03 IST

International News: पश्चिम इराकमध्ये अमेरिका आणि इराकी सैनिकांनी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या संशयित ठिकाणांवर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले. अमेरिकी लष्कराच्या सूत्रांनी शनिवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.

बगदाद - पश्चिम इराकमध्ये अमेरिका आणि इराकी सैनिकांनी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या संशयित ठिकाणांवर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले. अमेरिकी लष्कराच्या सूत्रांनी शनिवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. या कारवाईदरम्यान अमेरिकेचे ७ जवान जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांत अमेरिकेने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. इराक आणि सीरियामध्ये दहशतवाद्यांना प्रभावक्षेत्रातून बेदखल करण्यात आल्यानंतर या भागात तैनात असलेले अमेरिकी सैनिक आणि इसिसदरम्यान वर्षानुवर्षे सातत्याने लढाई सुरू आहे. अमेरिकी सूत्रांनुसार, दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रांसह बॉम्ब तसेच आत्मघाती स्फोटकांसह सज्ज होते. इराकी लष्करानुसार देशातील अनबर वाळवंटात हा हल्ला करण्यात आला. (वृत्तसंस्था)

इस्लामिक स्टेटला जेरीस आणण्याचा प्रयत्नइराकला लागून असलेल्या संपूर्ण प्रदेशात इराकी तसेच अमेरिकी नागरिकांसह या देशांच्या सहकाऱ्यांवर हल्ल्यांचा कट किंवा हल्ले करणाऱ्या इस्लामिक स्टेटच्या प्रमुख दहशतवाद्यांना जेरीस आणण्याचा तसेच त्यांची शक्ती क्षीण करण्याचा या अभियानाचा उद्देश होता, असे अमेरिकेच्या सूत्रांनी म्हटले आहे.

कारवाईत ७ अमेरिकी सैनिक जखमीअमेरिका-इराकने केलेल्या या संयुक्त कारवाईत ७ अमेरिकी सैनिकही जखमी झाले असल्याचे एका अधिकाऱ्याने आपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.- या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे हा अधिकारी म्हणाला.

कारवायांमध्ये वाढइस्लामिक स्टेटचे दहशतवादी इराक आणि सीरियात पुन्हा आपले बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या भागात त्यांनी केलेल्या हल्ल्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. २०२४च्या पहिल्या सहा महिन्यांतच या दोन्ही देशांत असे १५३ हल्ले झाले आहेत.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाUnited Statesअमेरिका