शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोमालियाजवळ हायजॅक झालेल्या जहाजातील भारतीयांबद्दल नौदलाकडून मिळाली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 20:25 IST

हायजॅकची माहिती मिळताच भारतीय नौदलाने रवाना केली होती आयएनएस चेन्नई युद्धनौका

MV Lila Norfolk to rescue hijacked vessel: सोमालियाच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात लायबेरियन ध्वजांकित मालवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आले होते. एमव्ही लीला नॉरफोक नावाच्या या जहाजामध्ये १५ भारतीय आहेत. माहिती मिळताच भारतीय नौदलाने आपली युद्धनौका आयएनएस चेन्नई या जहाजाला मुक्त करण्यासाठी पाठवले आणि शुक्रवारी दुपारी ते हायजॅक केलेल्या ठिकाणी पोहोचले.

INS चेन्नईची अपहरण झालेल्या जहाजावर कारवाईची सुरुवात

ताज्या माहितीनुसार, आयएनएस चेन्नईने अपहरण केलेले जहाज अडवले असून नौदलाचे मार्कोस कमांडो एमव्ही लीलावर उतरले आहेत. या कमांडोंनी जहाजात कारवाई सुरू केली आहे. सर्व १५ प्रवासी सुखरुप असल्याची माहिती नौदलाकडून घेण्यात आली आहे. याआधी, नौदलाच्या गस्ती विमानाने शुक्रवारी सकाळी अपहरण केलेले जहाज शोधून काढले आणि त्याच्याभोवती राहून विमानाने जहाजाशी संपर्क प्रस्थापित केला.

माहिती मिळताच कारवाईला सुरूवात

या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती ब्रिटीश लष्कराच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) या संस्थेने गुरुवारी दिली. यानंतर भारतीय नौदलाने सक्रियपणे या जहाजाचा शोध घेतला आणि शुक्रवारी सकाळी ते समुद्रात सापडले. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जहाजाच्या चालक दलाने गुरुवारी संध्याकाळी यूकेएमटीओला एक त्रासदायक गोष्टीबाबत संदेश पाठवला आणि त्यांना कळवले होते की पाच-सहा सशस्त्र अज्ञात लोक जहाजावर आले व त्यांनी जहाज ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत केला. त्यानंतर भारतीय नौदलाने तत्परता दाखवली आणि अपहरण झालेल्या जहाजाचा शोध सुरू केला. सागरी मार्गात जहाजांची सुरक्षित वाहतूक राखणे हा आता नौदलाचा निर्धार आहे.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल