शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानी हल्ल्यात १४१ अफगाणी सैनिक ठार

By admin | Updated: April 23, 2017 03:14 IST

उत्तर अफगाणिस्तानच्या एका सैन्य तळावर तालिबानींनी केलेल्या हल्ल्यात किमान १४१ अधिक अफगाणी सैनिक ठार झाले आहेत. या हल्ल्याने देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

काबूल : उत्तर अफगाणिस्तानच्या एका सैन्य तळावर तालिबानींनी केलेल्या हल्ल्यात किमान १४१ अधिक अफगाणी सैनिक ठार झाले आहेत. या हल्ल्याने देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मृतांचा आकडा १५० हून अधिक असल्याचे अफगाणी सैन्याच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मजार-ए-शरीफ शहराच्या जवळ झालेल्या हल्ल्यात किती नुकसान झाले याची माहिती मात्र मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली नाही. काही तास चाललेल्या या हल्ल्यात मशिद आणि भोजनालयातील सैैनिकांना लक्ष्य करण्यात आले. तालिबानच्या दोन हल्लेखोरांनी स्वत:ला उडवून देत मोठा हल्ला घडवून आणला. हे हल्लेखोर अफगाणी सैन्याच्या पोशाखात वाहनांमधून आले होते. या हल्ल्यात एकाही सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाला नाही. या हल्ल्यानंतर किती हल्लेखोरांना ठार मारण्यात आले, याची माहिती न देता संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अफगाणी सैन्याने सर्व हल्लेखोरांना मारले असून, एका हल्लेखोराला पकडण्यात अफगाणी सैन्याला यश आले आहे. अतिरेक्यांची आश्रयस्थाने नष्ट करा अफगाणिस्तानातील हल्ल्याचा भारताने स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे. तसेच अतिरेक्यांची सर्व आश्रयस्थाने नष्ट करण्याचे आवाहनही करताना त्या देशाच्या सीमेलगत असलेली अतिरेक्यांची अनेक आश्रयस्थाने नष्ट करायला हवीत, असे म्हटले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अफगाणिस्तानला सर्वोतोपरी मदत देण्याची भारताची तयारी आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)मोदींनी केला निषेध नवी दिल्ली : उत्तर अफगाणिस्तानात सैन्य तळावर झालेल्या तालिबानी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. मोदी यांनी व्टिट केले आहे की, मजार -ए-शरीफ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो.