शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्याकडे १३० अणुबॉम्ब, सजवून ठेवण्यासाठी नाहीत"; पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:41 IST

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कृतीनंतर पाकिस्तानी मंत्र्यांनी धमकी दिली आहे.

Pahelgam Attack Pakistan Railway Minister: पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून २६ जणांची हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे पाकिस्तान संतप्त झाला आहे. पाकिस्तानातील राजकीय नेत्यांकडून भारताला धमकावण्याचे प्रयत्न सुरु झालेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी यांनी सिंधू नदीतून आमचं पाणी वाहील किंवा त्यांचं रक्त वाहील, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी गरळ ओकली आहे.

 पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारताने घेतलेल्या निर्णयांनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एका पाकिस्तानी मंत्र्यांने भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री हनीफ अब्बासी यांनी पाकिस्तानची घौरी, शाहीन आणि गझनवी क्षेपणास्त्रे आणि १३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी ठेवली आहेत, असं म्हटलं. जर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचे धाडस केले तर युद्धासाठी तयार राहण्याची धमकीही अब्बासी यांनी दिली.

रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना अब्बासी यांनी भारताला धमकावले. "जर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. आमची सर्व क्षेपणास्त्रे भारताच्या दिशेने आहेत. जर भारताने कोणतीही कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. राजनैतिक प्रयत्नांसोबतच, आम्ही सीमांच्या सुरक्षेसाठीही व्यवस्था केल्या आहेत. पहलगाम हल्ला हे फक्त एक निमित्त आहे. सिंधू पाणी कराराकडेही लक्ष दिले जात आहे," असे हनीफ अब्बासी म्हणाले.

"आम्ही  गौरी, शाहीन, गझनवी ही क्षेपणास्त्रे चौकात सजावटीसाठी ठेवली नाहीत. आम्ही ती भारतासाठी ठेवली आहेत. आमच्याकडे असलेली १३० अण्वस्त्रे आम्ही फक्त मॉडेल बनवण्यासाठी ठेवली नाहीत आणि पाकिस्तानच्या कोणत्या भागात ठेवली आहेत हे तुम्हाला माहितीही नाही.तुम्ही असा विचारही करू नका की तुम्ही पाकिस्तानची सीमा ओलांडाल. जर तुम्ही याचा विचार केलात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील," असेही अब्बासी यांनी म्हटलं. याआधी सिंध प्रांतातील सुक्कुर येथे एका जाहीर सभेत बिलावल भुट्टो-झरदारी यांनी भारताला इशारा दिला होता. "आम्ही कोणालाही सिंधू नदीचा सौदा करू देणार नाही. आपला कमकुवतपणा लपवण्यासाठी आणि जनतेला मूर्ख बनवण्यासाठी, मोदी सरकार पाकिस्तानवर खोटे आरोप करून सिंधू पाणी करार एकतर्फी स्थगित करत आहे. पण मला सुक्कुरमध्ये सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला स्पष्ट संदेश द्यायचा आहे की सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर या नदीतून आमचं पाणी त्यातून वाहील किंवा त्यांचं रक्त वाहील," असे भुट्टो यांनी म्हटलं.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर