शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! 'ती' कोमातून बाहेर आली आणि दुसऱ्याच देशाची भाषा बोलू लागली; डॉक्टरही झाले हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 13:41 IST

कोमातून काही दिवसांनी बाहेर आलेली एक तरुणी चक्क दुसऱ्याच देशाची भाषा बोलू लागल्याची घटना घडली आहे.

प्रत्येकाच्या जीवनात हे चढ-उतार येत असतात. अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही घटना या मनावर कोरल्या जातात आणि त्यामुळे संपूर्ण आयुष्यच बदलतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. कोमातून काही दिवसांनी बाहेर आलेली एक तरुणी चक्क दुसऱ्याच देशाची भाषा बोलू लागल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही तरुणी कधीही या देशात गेली नव्हती तसेच तिला तेथील भाषेविषयी देखील माहिती नव्हती. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून डॉक्टर देखील हैराण झाले आहेत. 

अमेरिकेतील एका तरुणीचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर ती काही वेळ कोमात गेली होती. मात्र जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती भलतीच भाषा बोलू लागली. यामुळे डॉक्टर देखील आता गोंधळात पडले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय समर डियाज या मुलीचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोठा अपघात झाला होता. या अपघातात तिच्या डोक्यासह खांद्याला जबर मार लागला होता. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, अपघातानंतर ती दोन आठवडे कोमामध्ये होती. आपला अपघात कसा झाला याबाबत तिला आता काहीही आठवत नाही. 

डॉक्टरांनादेखील बसला धक्का

दोन आठवड्यांनंतर कोमातून बाहेर आल्यानंतर सुरुवातीला ती बोलू शकली नाही. मात्र, जेव्हा तिचा आवाज परत आला तेव्हा तिच्यासह डॉक्टरांनादेखील धक्का बसला. समर अचानक वेगळ्याच भाषेत बोलू लागली, तिची भाषा ऐकून रुग्णालयामधील सर्व कर्मचारी आश्चर्यचिकित झाले होते. ती रुग्णालमध्ये कोमात असताना कोरोनाच कहर पाहायला मिळाला. त्यामुळेच कोणी तिला भेटायला देखील आलं नव्हतं. मात्र त्यानंतर ती शुद्धीत आल्यावर तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

डॉक्टरांनी  पुढील तपासणी केल्यानंतर समरला फॉरेन एक्सेंट सिंड्रोम (Foreign Accent Syndrome) झाल्याचं निष्पन्न झालं. फॉरेन एक्सेंट सिंड्रोम ही एक मानसिक स्थिती आहे. ज्यामध्ये व्यक्ती अचानक दुसरी भाषा बोलू लागते. विशेष म्हणजे त्या भाषेचा आणि तिचा पूर्वी कधीही संबंध आलेला नसतो. समर डियाजच्या बाबतीमध्ये हेचं झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Americaअमेरिका