शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेतील महापुरात 119 जणांचा मृत्यू तर 150 बेपत्ता

By admin | Updated: May 27, 2017 22:23 IST

श्रीलंकेत आलेल्या पुराने अक्षरक्ष: हाहाकार माचवला असून या महापुरात आतापर्यंत 120 जणांनी आपला जीव गमावला आहे

ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. 27 - श्रीलंकेत आलेल्या पुराने अक्षरक्ष: हाहाकार माचवला असून या महापुरात आतापर्यंत 120 जणांनी आपला जीव गमावला असून कित्येकजण बेपत्ता झाले आहेत. 2003 नंतर पहिल्यांदाच श्रीलंकेत पुरामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भारताने तत्परतेने श्रीलंकेला मदत पाठवत नौदलाचे तीन जहाज रवाना केले आहेत. भारताने पाठवलेली मेडिकल आणि आपातकालीन टीम श्रीलंकेत पोहोचली आहे. भारताने पाठवलेलं "किर्च" शनिवारी कोलंबोत दाखल झालं. या जहाजातून औषध साहित्य पाठवण्यात आलं आहे. 
 
(श्रीलंकेत पावसाचे 91 बळी)
 
सखल भागात पाणी भरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने चेतावणी दिली आहे. श्रीलंकेतील परिस्थिती खूपच बिघडली असून भारताने देवदूताप्रमाणे धाव घेत मदतीला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी शोक व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "गरज पडल्यास आम्ही श्रीलंकेतील आमच्या बहिण भावांसोबत उभे राहू".
 
मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर व भूस्खलनाने श्रीलंकेत 119  जणांचा बळी घेतला आहे. देशातील 20 हजार नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे.  गुरुवार व शुक्रवार मिळून देशात 300 ते 500 मिमी पाऊस झाला. काही भागात तर 600 मिमी पावसाची नोंद झाली आहे. श्रीलंकेचे हवाई दल आणि नौदलाचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टर आणि बोटींच्या माध्यमातून मदत करीत आहेत. 2003 रोजी पावसाने व भूस्खलनाने देशातील दक्षिण भागात 250 नागरिकांचा बळी घेतला होता.
 
श्रीलंकेत आलेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे पश्चिम आणि दक्षिण भागात पूर आला आहे. पुराने गेल्या 14 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. बचावकार्यादरम्यान श्रीलंका नौदलाच्या एका जवानाचा हेलिकॉप्टरमधून पडून मृत्यू झाला. परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.