शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मला आईसोबत पुन्हा भारतात यायचंय हो; पोलंडच्या ११ वर्षीय मुलीचं मोदींना भावुक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 11:44 IST

पोलंडच्या 11 वर्षांच्या मुलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

 पोलंडः पोलंडच्या 11 वर्षांच्या मुलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. पत्र लिहित तिनं भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एलिजा वानात्को नावाची मुलगी आणि तिच्या आईला कालावधीपेक्षा अधिक काळ भारतात थांबल्यानं काळ्या यादीत टाकण्यात आलं. वानात्कोनं स्वतः हस्तलिखितात हे पत्र लिहिलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. पत्रात ती म्हणते, भगवान शंकरावर माझी अपार श्रद्धा आणि प्रेम आहे, नालंदा देवी पर्वत आणि गोव्यातील गाईंची केलेली सेवा कधीही विसरू शकत नाही. वानात्कोनं लिहिलेलं हे पत्र तिच्या आईनं ट्विटरवर शेअर केलं आहे.तसेच ट्विटमध्ये तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एस. जयशंकर यांना टॅग केलं आहे. मला गोव्यातील माझ्या शाळेवर नितांत प्रेम आहे. मला एनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये गाईंची केलेल्या देखभालीची आठवण सतावते आहे. माझ्या आईला 24 मार्च 2019मध्ये भारतात येऊ दिलं नाही. तिचं नाव ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं. कारण आम्ही इथे बऱ्याच काळापासून वास्तव्याला होतो. वानात्कोची आई ही एक कलाकार आणि फोटोग्राफर आहे. ती भारतात बी2बी व्हिसावर आलेली होती. कोटलारस्का भारतीय व्हिसाच्या नूतनीकरणासाठी श्रीलंकेला गेली होती. परंतु भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचा व्हिसा वाढवून दिला नाही आणि त्यांना 24 मार्चला परत पाठवलं. पत्रात वानात्को लिहिते, माझ्या आईला 24 मार्च रोजी दुसऱ्यांदा भारतात प्रवेश नाकारण्यात आला.व्हिसा संपल्यानं आम्हाला काळ्या यादीत टाकण्यात आलं. आमची काहीही चूक नसताना आमच्याबरोबर असं करण्यात आलं. मी भारतीय नसले तरीही भारताला स्वतःचं घर मानते. त्यांच्या पत्राला सरकारनं कोणतंही उत्तर दिलेलं नाही. सध्या त्या माय-लेकी कंबोडियात असून, भारतात येण्याची वाट पाहत आहेत. मी भगवान शंकर आणि नालंदा देवीकडे मदतीची प्रार्थना करते. तुम्ही सर्वात शक्तिशाली व्यक्ती असल्यानं पत्र लिहित असल्याचं त्या चिमुकलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून सांगितलं आहे. आम्हाला मदत करा आणि काळ्या यादीतून आमचं नाव काढा, असंही त्या चिमुकलीनं पंतप्रधानांना सांगितलं.