शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत जाण्याचं स्वप्न ठरलं जीवघेणं! -३५ डीग्री तापमानात पती-पत्नी आणि मुलांचा मृत्यू; समोर आली हादरवणारी कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 19:59 IST

११ गुजराती लोकांना बेकायदेशीरपणे कॅनडातून अमेरिकेत जाण्यासाठी पाठवणाऱ्या दोन आरोपींना गुजरातमधील गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली.

११ गुजराती लोकांना बेकायदेशीरपणे कॅनडातून अमेरिकेत जाण्यासाठी पाठवणाऱ्या दोन आरोपींना गुजरातमधील गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. या ११ जणांपैकी चार लोक गांधीनगरच्या पटेल कुटुंबातील होते. ज्यांना या दोन्ही आरोपींनी उणे ३५ अंश तापमानात चालण्यास सांगितलं होतं आणि बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून अमेरिकेत कसा प्रवेश करायचा ते सांगितलं गेलं होतं. सुमारे वर्षभरापूर्वी कॅनडाच्या पोलिसांना अमेरिकेच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर ४ जणांचे मृतदेह सापडले होते. या चौघांमध्ये पती पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भावेश पटेल आणि योगेश पाटे या दोघांनाही बेकायदेशीर इमिग्रेशन (मानवी तस्करी) आणि हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या दोघांचे त्या ११ गुजरातींसोबत शेवटचं काय बोलणं झालं होतं हे पोलिसांनी सांगितलं. "तुम्हाला उणे ३५ अंश तापमानात चालावे लागेल जेणेकरून कॅनडाचे आणि यूएस पोलिस दल तुम्हाला अटक करू शकत नाहीत. तुम्हाला रात्रीच्या अंधारात अमेरिकन गॅस स्टेशनच्या लाइटला फॉलो करावे लागेल, तुम्हाला या भागात नेव्हिगेशन मिळणार नाही", असं आरोपींचं अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसू पाहणाऱ्यांसोबत शेवटचं बोलणं झालं होतं. 

सीमेपासून १२ मीटर अंतरावर सापडले मृतदेहमानवी तस्करांनी गुजराती कुटुंबाला दिलेल्या या शेवटच्या सूचना होत्या, असे पोलिसांनी सांगितले. जगदीश पटेल (३९), वैशाली पटेल (३७) आणि त्यांची दोन मुले विहांगी पटेल (११) आणि धार्मिक पटेल (३) यांचे मृतदेह अमेरिकेच्या सीमेपासून अवघ्या १२ मीटर अंतरावर कॅनडाच्या पोलिसांना सापडले. त्यांच्या दुःखद मृत्यूनंतर ही बाब स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चव्हाट्यावर आली. लोक हताश होऊन मोठी रक्कम देऊन बेकायदेशीरपणे सीमा ओलांडतात, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

कॅनडामधील फेनिल पटेल आणि बिट्टू पाजी नावाचे आणखी दोन आरोपी कॅनडामधून अवैध स्थलांतरित होण्यासाठी लोकांना मदत करत होते. फेनिल आणि बिट्टूची खरी नावे समोर आलेली नाहीत, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

टॅग्स :USअमेरिका