शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

१०४ वर्षांचा शास्त्रज्ञ इच्छामरण घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 03:22 IST

डेव्हिड गूडाल हे १०४ वर्षांचे आॅस्ट्रेलियातील वयोवृद्ध वैज्ञानिक पुढील महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण घेणार आहेत. ते पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत

सिडनी : डेव्हिड गूडाल हे १०४ वर्षांचे आॅस्ट्रेलियातील वयोवृद्ध वैज्ञानिक पुढील महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण घेणार आहेत. ते पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. दोन वर्षांपूर्वी पथच्याा एडिथ कोवान विद्यापीठाने, कॅम्पसमध्ये राहण्यास अपात्र ठरवून, त्यांना सामानसुमानासह सक्तीने घराबाहेर काढले, तेव्हा जगातील वैज्ञानिक त्यांच्या पाठीशी उभे राहिले.आॅस्ट्रेलियात इच्छामरणासबंदी असून, व्हिक्टोरिया राज्याने अपवादात्मक परिस्थितीत इच्छामरणाची अनुमती देणाराकायदा केला. तो जून २०१९ मध्ये अंमलात येईल. तोे मरणासन्न अवस्थेत असलेल्या व सहा महिने जगण्याची शक्यता असलेल्यांनाच लागू होईल.गूडाल गलितगात्र आहेत, पण ते मरणासन्न नाहीत. त्यामुळे आॅस्ट्रेलियात इच्छामरण घेणे शक्य नसल्याने त्यांनी स्वित्झर्लंडमधील बेसेल येथील दयामरण देणाऱ्या संस्थेत मृत्यूला कवटाळण्याचे ठरविले आहे.गेल्या महिन्यात १०४ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांनी ‘एबीसी’ वृत्तवाहिनीला सांगितले की, इतकी वर्षे जगल्याचा मला पश्चात्ताप होतोय. मी बिलकूल आनंदी नाही, मला मृत्यू हवाय! नैसर्गिक मृत्यू येत नसल्याचे दु:ख नाही. पण मृत्यू येण्यासाठी काही करू शकत नसल्याने मी निराश आहे. दयामरणाचा पुरस्कार करणारी ‘एक्झिट इंटरनॅशनल’ ही संस्था त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांना मदतनीसासह दयामरणासाठी स्वित्झर्लंडला जाता यावे यासाठी संस्थेने ‘गो फंड मी’ ही आॅनलाइन निधीसंकलन मोहीम चालवून १७ हजार अमेरिकन डॉलर उभे केले आहेत.