लंडन : वृद्धावस्थेत अनेक जणांना गुडघेदुखी आणि अन्य आजारांचा त्रास होतो; पण लंडनमधील १०१ वर्षांच्या या वृद्धाचा पराक्रम तरुणांनाही लाजवणारा आहे. ब्रिटनमधील वेरडन हाइस हे माजी सैनिक आहेत.ते पत्नीसह स्कायडाइव करू इच्छित होते. तत्पूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. वेरडन यांनी मुलगा ब्रेन, नातू रोजर आणि पणतू स्टेन यांच्यासह १५ हजार फूट उंचीवरून झेप मारली. १०१ व्या वर्षी एवढ्या उंचीवरून उडी मारणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वीचा विक्रम १०१ वर्षांच्या कॅनेडियन व्यक्तीच्या नावावर होता. रॉयल ब्रिटिश आर्मीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्हाला वेरडन आणि त्यांच्या कुटुंबियांचा गर्व आहे.
१०१ वर्षांच्या वृद्धाने १५ हजार फुटांवरून मारली उडी
By admin | Updated: May 23, 2017 02:45 IST