शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

“जहाज गायब झाल्यास १००% रिफंड”; बर्म्युडा ट्रँगलच्या ट्रिपसाठी कंपनीकडून विचित्र ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 07:59 IST

अटलांटिक महासागरात बार्बाडोस, फ्लोरिडा आणि प्युर्टो रिकोदरम्यान ५ लाख चौरस किलोमीटरचा बर्म्युडा ट्रँगल हा पट्टा येतो.

न्यू यॉर्क : अनेक वर्षांपासून बर्म्युडा ट्रँगल हे जगासाठी एक रहस्य राहिले आहे. आजपर्यंत बर्म्युडा ट्रँगलमध्ये अनेक विमाने आणि जहाजे बेपत्ता झालीत. वर्षानुवर्षे संशोधन करूनही शास्त्रज्ञांना त्याचे रहस्य उलगडता आलेले नाही. पण, आता अमेरिकास्थित ट्रॅव्हल एजन्सीने बर्म्युडा ट्रँगलच्या प्रवासासाठी एक विचित्र ऑफर आणली आहे.

अटलांटिक महासागरात बार्बाडोस, फ्लोरिडा आणि प्युर्टो रिकोदरम्यान ५ लाख चौरस किलोमीटरचा बर्म्युडा ट्रँगल हा पट्टा येतो. अमेरिकी ट्रॅव्हल एजन्सी एन्शियंट मिस्ट्रीज क्रूझने ही ऑफर जाहीर केली आहे. आमची क्रूझ बर्म्युडा ट्रँगलची सफर करुन परत येईल आणि जर जहाज बेपत्ता झालेच तर एजन्सीकडून पूर्ण रिफंड मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.  

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुढील वर्षी मार्चमध्ये प्रवासी नॉर्वेजियन प्राइमा लाइनरने न्यूयॉर्क ते बर्म्युडा असा प्रवास करतील. हा ५ दिवसांचा प्रवास असेल आणि यासाठी प्रवाशांना एका केबिनसाठी सुमारे १,४५० पाऊंड म्हणजे सुमारे दीड लाख रुपये मोजावे लागतील. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या ही विचित्र ऑफर व्हायरल झाली असून नेटकरी चांगलेच हैराण झालेत. बेपत्ता झाल्यास परतावा तरी कोणाला देणार, अशा प्रतिक्रिया येत आहेत.

बर्म्युडा ट्रँगलच्या या प्रवासात बेपत्ता होण्याची काळजी करु नका. तुम्ही बेपत्ता झाल्यास शंभर टक्के परतावा मिळेल, अशी जाहिरात त्यांनी वेबसाइटवर दिली आहे. यासोबतच बेपत्ता होण्याची शक्यता दुर्मिळ आहे असेही नमूद करण्यात आले आहे.   

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गInternationalआंतरराष्ट्रीय