शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिद्द असावी तर अशी...! एकदा,दोनदा नव्हे चारवेळा प्रयत्न; IPS बनूनही सोडलं नाही IAS बनण्याचं स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:47 IST

सातत्याने मिळणारे अपयश तरीही त्यात हिंमत न हारता पुन्हा त्या प्रयत्न करत होत्या.

भारतीय लोक सेवा आयोग (UPSC) ची परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतात. परंतु या संघर्षात काहीच लोक यशस्वी होतात. बऱ्याचदा अपयशामुळे अनेकजण हिंमत हरतात आणि प्रयत्न करणे सोडून देतात. मात्र जिद्द अन् मेहनत कायम ठेवली तर यशाचे दार नक्कीच उघडतात हे आयएएस अधिकारी अर्पिता ठुबे यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते.

महाराष्ट्राच्या ठाण्यातून येणाऱ्या अर्पिता सुरूवातीपासून शिक्षणात हुशार होत्या. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींगहून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले. परंतु देश सेवेची प्रबळ इच्छा मनात होती. त्यातूनच पुढे UPSC परीक्षेची त्यांनी तयारी सुरू केली. एक, दोन, तीन नव्हे तर चौथ्या प्रयत्नात अर्पिता ठुबे आयएएस अधिकारी होण्यात यशस्वी झाल्या. अर्पिता यांनी पहिल्यांदा २०१९ साली यूपीएससी परीक्षा दिली होती. परंतु प्रीलिम्समध्येच अपयश आल्याने त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर न खचता त्यांनी हा शिकण्याचा अनुभव म्हणून पुढे तयारी सुरूच ठेवली.

सातत्याने मिळणारे अपयश तरीही त्यात हिंमत न हारता पुन्हा त्या प्रयत्न करत होत्या. २०२० मध्ये पुन्हा परीक्षेला आल्या. त्यावेळी देशात ३८३ वी रँकिंग मिळवली. त्यांची भारतीय पोलीस सेवेत निवड झाली. परंतु IAS होण्याचं त्यांचं स्वप्न कायम होते. २०२१ साली तिसऱ्यांदा अर्पिता यांनी परीक्षा दिली. परंतु यावेळीही त्या IAS साठी पात्र ठरल्या नाहीत. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात आयपीएस नोकरीतून काही काळ विश्रांती घेत यूपीएससी तयारी केली तेव्हा २०२२ साली मेहनतीला यश मिळालं. त्या २१४ व्या रॅकिंगसह IAS बनल्या. 

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यातून कधीही न खचता तुमची मेहनत सुरूच ठेवली पाहिजे. बऱ्याचदा अपयश येते, त्यातून खचून न जाता जिद्द, चिकाटी कायम ठेवली तर कधी तरी यश मिळतेच हेच अर्पिता ठुबे यांच्याकडे पाहिल्यास दिसून येते. जर तुमचं स्वप्न मोठं असेल तर त्यासाठी जीवापाड मेहनत घ्यायला हवी. अशक्य असं काही नाही. अर्पिता ठुबे यांची ही कहाणी प्रत्येक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. ज्यांनी इतक्या अपयशानंतरही आयएएस होण्याची जिद्द सोडली नाही.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी