शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

IAS Success Story: आधी MBBS, नंतर IPS आणि अखेर IAS, पाहा पंकज यादव यांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 12:13 IST

success story of IAS topper Pankaj Yadav who clears UPSC exam in 2019 in his third attempt : गावातील सरकारी शाळेतून शिक्षण घेतलेल्या पंकज यादव यांनी आजवर अनेकदा मोठं यश मिळवलं आहे....

ठळक मुद्देगावातील सरकारी शाळेतून शिक्षण घेतलेल्या पंकज यादव यांनी आजवर अनेकदा मोठं यश मिळवलं आहे.पंकज यादव यांनी MBBS चंदेखील घेतलं शिक्षण

Success Story Of IAS Topper Pankaj Yadav: स्वत:वर विश्वास असला तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं म्हटलं जातं. मेहनत आणि प्रयत्न हे यशासाठी महत्त्वाचे असतात. हरयाणामध्ये राहणारे पंकज यादव हे यापैकीच मोठं उदाहरण आहेत. पंकज यादव हे रेवाडी जिल्ह्यातील छोट्या गावातील रहिवासी आहेत. त्यांचं बारावी पर्यंतचं शिक्षण हे त्याच ठिकाणच्या सरकारी शाळेतून झालं. तर त्यांनी रेवाडी येथूनच आपलं एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. पंरतु पंकज यादव यांनी स्वत:च्या मेहनीच्या जोरावर यशाची शिखरं गाठलं. पंकज यादव यांनी सर्वप्रथम एमबीबीएस MBBS, त्यानंतर आयपीएस IPS आणि त्यानंतर आयएएस IAS ही पदं मिळवून स्वत:ला सिद्ध केलं आहे. दिल्ली नॉलेज ट्रॅकला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपला आजवरचा प्रवास उलगडला आहे. ज्या प्रमाणे शहरातील मुलांना सुखसुविधा मिळतात त्याप्रमाणे आपल्याला त्या तितक्या प्रमाणात मिलाल्या नसल्याचं त्यांनी सांगितलं. पंकज यांनी सरकारी शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी काही करण्याचा निश्चय केला. आपण अशा कोणत्यातरी क्षेत्रात जावं ज्या ठिकाणी आपल्याला तरूणांना मदत करता येईल असं त्यांनी ठरवलं. यानंतर त्यांनी यूपीएससी सीएसई परीक्षा देण्याचा निर्णय गेतला. त्यांनी आपल्या पहिल्या प्रयत्नापासून अखेरच्या प्रयत्नापर्यंत तयारी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. परंतु त्यांना आपल्या मनासारखं पद हे तिसऱ्या प्रयत्नात मिळालं. पहिल्या प्रयत्नात ते मुलाखतीच्या राऊंडपर्यंत पोहोचले, परंतु त्यांची निवड झाली नाही. त्यानंतर पूर्वीच्या परीक्षेतून शिकून त्यांनी २०१८ मध्ये पुन्हा एकदा परीक्षा दिली. यावेळी त्यांना ५८९ वा रँरक मिळाला. त्यावेळी त्यांना आय़पीएस सेवा मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा पंकज यांनी परीक्षा दिली आणि ५६ वा क्रमांक पटकावला. तसंच यानंतर त्यांची आयएएस या पदासाठी निवड झाली. कसा होता अनुभव?जर स्वत:वर विश्वास असेल तर कोणत्याही उमेदवाराची पार्श्वभूमी त्याच्या मार्गातील अडथळा बनू शकत नाही. आपल्याकडे काय आहे किंवा नाही याकडे कधीच लक्ष देऊ नये. केवळ आपल्याला ध्येय गाठायचं आहे याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यासोबत योग्य मार्गदर्शन मिळवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असंही त्यांनी सांगितलं. जर तुम्हाला कोणीही मार्गदर्शन करणारं नसेल तर घाबरून न जाता इंटरनेटची मदत घेतली पाहिजे. आजकालच्या जमान्यात सर्व समस्यांचं निराकरण हे इंटरनेटकडे आहेत. या ठिकाणी तुम्ही परीक्षेचं पॅटर्न, गेल्या वर्षीचे पेपर, टॉपर्सच्या मुलाखती पाहू शकता आणि आपल्या आयुष्यात त्याचा उपयोगही करून घेऊ शकता असा सल्लाही पंकज यांनी दिला. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीHaryanaहरयाणाdoctorडॉक्टर