शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टमास्तरचा मुलगा झाला सहायक वनसंरक्षक; मंगेश गिरडकरची भरारी, MPSC उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 07:37 IST

मंगेश दिवाकर गिरडकर (नांदगाव) असे सहायक वनसंरक्षकपदी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे

अंकुश गुंडावार गोंदिया : अपयशाने खचून न जाता सातत्याने ध्येयाचा पाठलाग केल्यास निश्चितच यश मिळते. वडिलांचे परिश्रम, कुटुंबाचा त्याग आणि भावंडांचा आधार या सर्वांची जाणीव ठेवत, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशाचा पाठलाग करताना अखेर यश पदरात पडले. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील नांदगाव या छोट्याशा गावातील सेवानिवृत्त पोस्टमास्तरच्या मुलाने ही परीक्षा उत्तीर्ण होत, सहायक वनसंरक्षक पदावर नियुक्त होण्याचा मान पटकाविला.  

मंगेश दिवाकर गिरडकर (नांदगाव) असे सहायक वनसंरक्षकपदी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मंगेशचे वडील सेवानिवृत्त पोस्टमास्तर असून, आई गृहिणी, तर दोन भाऊ शिक्षक आहेत. सुरुवातीला परिस्थिती हलाखीची असतानाही खर्चात काटकसर करून काही झाले, तरी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे, हा ध्यास त्याच्या वडिलांनी बाळगला. मंगेशसह महेश आणि नीलेश या दोन्ही भावंडांनीही वडिलांचा त्याग आणि परिश्रमाची पूर्ण जाणीव ठेवीत परिश्रम घेतले. महेश आणि नीलेश हे दोघेही शिक्षक आहेत. मंगेशने प्राथमिक शिक्षण नांदगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल, तर माध्यमिक शिक्षण राजुरा येथून पूर्ण केले. त्यानंतर, चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून तो एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. सुरुवातीला त्याला यात अपयश आले, पण तो निराश झाला नाही. 

गावाला कधीही विसरणार नाही अपयश आले, तरी निराश व्हायचे नाही आणि यश मिळाले, म्हणून भारावून जायचे नाही. परिस्थिती, आई-वडिलांच्या  कष्टाची जाणीव ठेवायची, आपण जिथे शिकून मोठे झालो, त्या गावाला कधीही विसरणार नाही. मी कितीही मोठ्या पदावर गेलो, तरी मु.पो. नांदगाव हे आपल्या मुखात सदैव राहणार आहे, असे मंगेशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

सलग आठ ते दहा तास अभ्यास  : काहीही झाले, तरी ध्येय गाठायचेच, असा निश्चय करून तयारी केली. अभ्यासात सातत्य ठेवत जिद्द, चिकाटीने कठाेर परिश्रम घेत यशाचा पाठलाग केला. दिवसातून सलग आठ ते दहा तास अभ्यास केला. अखेर या सर्वांचे चीज झाले. 

माझ्या कष्टाची मुलांनी केली फुलेमुले आपल्यापेक्षा मोठी व्हावीत, त्यांनी आकाशाला गवसणी घालावी, परिस्थितीची जाणीव ठेवावी, ही प्रत्येकच आई-वडिलांची इच्छा आणि अपेक्षा असते. माझ्या तिन्ही मुलांनी याची जाणीव ठेवीत गाठलेल्या यशाने खरोखरच माझ्या कष्टाची फुले झाल्याचा मला मनापासून आनंद आहे. - दिवाकर गिरडकर (मंगेशचे वडील)

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा