शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सकाळी प्रोफेसर अन् रात्री हमाली...हैराण करणारी 'या' व्यक्तीची संघर्ष कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 07:45 IST

ओडिशातील ध्येयवादी व्यक्तीची कथा; विद्यार्थ्यांकडून फीची अपेक्षा नाही

अंबिकाप्रसाद कानुनगोभुवनेश्वर : गरीब घरातील मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी ओडिशातील गंजम जिल्ह्यात नागेशू पात्रो (३१ वर्षे) यांनी स्टुडंट्स अकॅडमी सुरू केली आहे. त्यात शिकणाऱ्या ५२ मुलांनी फी दिलीच पाहिजे, अशी अट त्यांनी घातलेली नाही. स्वत: नागेशू सकाळी एका कॉलेजमध्ये शिकवितात व रात्री ब्रह्मपूर रेल्वेस्थानकावर हमाल म्हणून काम करतात. त्या कामांतून वेळ काढून ते गरीब घरातील मुलांना शिकवितात.

त्यांचे लहानपण अतिशय कष्टात व गरिबीत केले. शिकण्यासाठी, जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यामुळे गरीब मुलांना शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्या असे मला वाटू लागले असे नागेशू पात्रो यांनी सांगितले. गंजम जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथील मनोहर या गावाचे ते रहिवासी आहेत. 

नागेशूच्या यांच्या कमाईवर त्यांचे घर चालते. शालेय जीवनात ते हुशार विद्यार्थी म्हणून नावाजले गेले. पहिली ते पाचवी इयत्तेपर्यंत त्यांनी नेहमी फर्स्ट क्लास मिळविला. ते अकरावी इयत्तेपर्यंत शिकले आहेत. मात्र बारावीच्या परीक्षेची फी भरणे पालकांना शक्य न झाल्यामुळे २००६ साली नागेशू पात्रो ती परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी सुरत शहरात एका मिलमध्ये दोन वर्षे नोकरी केली. मात्र तब्येतीच्या तक्रारींमुळे ते पुन्हा गावी परत आले. २०१२ साली बहि:शाल अभ्यासक्रमाद्वारे  त्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यानंतर पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. हे काम करताना ते ब्रह्मपूर रेल्वे स्थानकावर हमाल म्हणून काम करून उरलेल्या वेळात अभ्यास करायचे.

स्वत:च्या कमाईतून शिक्षकांचा पगारनागेशू पात्रो सेवाभावी वृत्तीने कोचिंग क्लास चालवितात. प्राध्यापक व हमाल म्हणून काम केल्यानंतर जे पैसे मिळतात त्यातून ते क्लासमधील शिक्षकांना पगार देतात. त्यांच्याकडे रेल्वेस्थानकावर हमालीचे काम करण्याचा २०११ सालापासून परवाना असला तरी त्यांना कायम करण्यात आलेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.