शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

विश्व हॉकी लीग फायनल भारत जर्मनीकडून पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 05:13 IST

वेगवान सुरुवात करणारा भारतीय संघ विश्व हॉकी लीग फायनलच्या अखेरच्या साखळी सामन्यात सोमवारी जर्मनीकडून मात्र ०-२ ने पराभूत झाला

भुवनेश्वर: वेगवान सुरुवात करणारा भारतीय संघ विश्व हॉकी लीग फायनलच्या अखेरच्या साखळी सामन्यात सोमवारी जर्मनीकडून मात्र ०-२ ने पराभूत झाला. कलिंगा स्टेडियमवर जर्मनीकडून हेनर मार्टिनने १७ व्या तसेच मॅट्स ग्रॅमबुशने २० व्या मिनिटाला गोल केले.आॅस्ट्रेलियाला १-१ असे बरोबरीत रोखल्यानंतर इंग्लंडकडून भारतीय संघ २-३ ने पराभूत झाला. त्यामुळे दोन पराभव पत्करणाºया भारतीय संघाला केवळ एका गुणाची कमाई होऊ शकली. या विजयासोबत जर्मनी संघ ‘ब’ गटात अव्वल स्थानावर आला. जर्मनीची बचावफळी भक्कम मानली जाते. आज ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली. जर्मनीच्या खेळाडूंनी भारताचे हल्ले वारंवार थोपवून लावले शिवाय भारतीय बचाव फळीला अनेकदा चकविले. पाहुण्या खेळाडूंना मोजक्याच संधी मिळाल्या तरीही त्यांनी पुरेपूर लाभ घेत मध्यंतरापर्यंतच्या खेळात २-० अशी आघाडी मिळविली होती. जर्मनीने पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर केला. कर्णधार मार्टिन हेनर याने दुसºया क्वार्टरच्या सुरुवातीला गोलकिपर आकाश चिकटे याच्या उजवीकडून चेंडू काढून शानदार गोल केला. दोन मिनिटानंतर मॅट्सने भारतीय बचावफळी भेदून डीमध्ये स्थान मिळविले. त्याने मारलेला चेंडू विरेंद्र लाक्राच्या स्टीकला लागून गोलजाळीत विसावला. दुसरा गोल होताच भारतीय चाहत्यांमध्ये निराशा परसली. मैदानावर सर्वत्र शुकशुकाट सुरू झाला. त्यानंतर भारताने पाठोपाठ हल्ले चढविले पण गोलजाळीच्या जवळ येताच फिनिशिंगमध्ये भारतीय संघ कमी पडला.मनदीपसिंगचा शानदार प्रयत्न जर्मनीच्या गोलकिपरने हाणून पाडताच अखेरची आशा देखील संपुष्टात आली. सामन्याअखेरीस भारताने हल्ले वाढविले पण प्रतिस्पर्धी संघाच्या गोलफळीपर्यंत पोहोचण्यात आक्रमक फळी अपयशी ठरली.(वृत्तसंस्था)

टॅग्स :Hockeyहॉकी