शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: भारताच्या दोन्ही संघांची उपांत्यफेरीत धडक हा आश्चर्याचा धक्का: दिलीप तिर्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 06:58 IST

Indian Hockey in Tokyo Olympics: ‘भारताच्या पुरुष आणि महिला हाॅकी संघाने टोकियो ऑलिम्पिकची उपांत्यफेरी गाठणे हा हॉकी चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे,’ हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

- नीलेश देशपांडे नागपूर : ‘भारताच्या पुरुष आणि महिला हाॅकी संघाने टोकियो ऑलिम्पिकची उपांत्यफेरी गाठणे हा हॉकी चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे,’ हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.सलग तीनवेळा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत कारकिर्दीत ४१२ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले तिर्की पुढे म्हणाले, ‘हॉकीपटूंना अशा कामगिरीची प्रतीक्षा होतीच. प्रथमच दोन्ही संघांनी ऑलिम्पिकची उपांत्यफेरी गाठणे कौतुकास्पद आहे. हा मोठा क्षण आहे, दोन्ही संघांचा खेळ पाहणे फारच सुखद ठरले. पुरुष संघाने काल ब्रिटनविरुद्ध आणि महिला संघाने आज ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाविरुद्ध केलेली कामगिरी शारीरिक आणि मानसिक कणखरतेचे प्रतीक ठरली. दोन्ही संघांनी आता ताजेतवाने होऊन उपांत्य सामन्यातदेखील आपल्या रणनीतीवर कायम राहायला हवे. ‘तुम्ही चांगली कामगिरी करू शकता’, याची शाश्वती मिळाल्यास युवा खेळाडू किती अप्रतीम कामगिरी करू शकतात हे दोन्ही संघांनी उपांत्यफेरी गाठून दाखवून दिले आहे. संघाच्या यशात विदेशी कोचेसचे योगदान मोठे असल्याचे सांगून पद्‌मश्री तसेच अर्जुन पुरस्काराचे मानकरी माजी राज्यसभा सदस्य तिर्की पुढे म्हणाले, ‘महिला संघासोबत कोच सोजर्ड मारजिने दीर्घकाळापासून आहेत. भारतीय खेळाडूंची मानसिकता बदलण्यात विदेशी कोच उपयुक्त ठरले यात शंका नाही.’

टॅग्स :Hockeyहॉकीindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021