शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय युवा हॉकी संघाची विजयी सलामी, जपानचे कडवे आव्हान ३-२ असे परतावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 04:03 IST

चुरशीच्या झालेल्या सामन्यात दलप्रीत सिंगने केलेल्या शानदार दोन गोलच्या जोरावर भारताच्या ज्यूनिअर पुरुष हॉकी संघाने सातव्या सुलतान जोहोर चषक स्पर्धेत विजयी सलामी दिली.

जोहोर बहरु (मलेशिया) : चुरशीच्या झालेल्या सामन्यात दलप्रीत सिंगने केलेल्या शानदार दोन गोलच्या जोरावर भारताच्या ज्यूनिअर पुरुष हॉकी संघाने सातव्या सुलतान जोहोर चषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना जपानचे कडवे आव्हान ३-२ असे परतावले.तमान दाया हॉकी स्टेडियममध्ये झालेल्या या रंगतदार सामन्यात भारताने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या सत्रात वर्चस्व राखल्यानंतर भारताला जपानकडून कडवी टक्कर मिळाली.११व्या मिनिटालाच दलप्रीतने गोल करत भारताला आघाडीवर नेले. हीच आघाडी पहिल्या क्वार्टरपर्यंत भारताने कायम राखली. यानंतर २३व्या मिनिटाला क्योहेई ओगावा याने गोल करुन जपानला १-१ अशी बरोबरी साधून दिली.तिसºया क्वार्टर मध्ये दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करताना आक्रमणाला प्रतिआक्रमणाने उत्तर दिले.यावेळी ओगावाने पुन्हा एकदा भारतीय क्षेत्रात मुसंडी मारत ३१व्या मिनिटाला वेगवान गोल करताना जपानला आघाडीवर नेले. परंतु, ४१व्या मिनिटाला सुखजीत सिंगने महत्त्वपूर्ण गोल करुन भारताला २-२ असे बरोबरीवर आणल्यानंतर ५३व्या मिनिटाला दलप्रीतने सामन्यातील निर्णायक गोल करून भारताला ३-२ असे आघाडीवर नेले.यानंतर, हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना भारताने जपानला पराभवाचा धक्का देत स्पर्धेला विजयी सुरुवात केली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Hockeyहॉकी