शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

भारतीयांची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:07 IST

महिला हॉकी; दुसऱ्या सामन्यातही द. कोरियावर २-१ ने मात

जिनचियोन (कोरिया) : भारतीय महिला हॉकी संघाने एका गोलच्या पिछाडीनंतरही मुसंडी मारताना बुधवारी दुसºया सामन्यात दक्षिण कोरियावर २-१ असा शानदार विजय मिळवला. यासह भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या हॉकी मालिकेत २-० अश्ी विजयी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात भारताने कोरियाचा याच फरकाने पराभव केला होता. उभय संघांदरम्यान तिसरा आणि अखेरचा सामना शुक्रवारी रंगणार आहे.

भारताकडून कर्णधार राणी रामपाल हिने ३७ व्या आणि नवज्योत कौरने ५० व्या मिनिटाला गोल केला. कोरियाकडून १९ व्या मिनिटाला ली स्युंगजू हिने मैदानी गोल नोंदवून खाते उघडले होते. दोन्ही संघांनी सुरुवात आक्रमक केली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले. तथापि उभय संघाच्या गोलकीपरने परस्परांचे मनसुबे उधळून लावले. दुसºया क्वॉर्टरच्या चौथ्या मिनिटाला कोरियाने गोल नोंदविताच मध्यंतरापर्यंत यजमान संघ १-० ने आघाडीवर होता.

राणीने ३७ व्या मिनिटाला गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर भारतीय खेळाडूंनी कोरियावर दडपण कायम राखले. याचा लाभ घत नवज्योतने ५० व्या मिनिटाला गोल नोंदविला. तिचा हा गोल निर्णायक ठरला. (वृत्तसंस्था)आमची कामगिरी पहिल्या सामन्याच्या तुलनेत खूप सरस होती. खेळावर संपूर्ण नियंत्रण होते. सातत्य असल्याने खेळाचा दर्जा चांगला होता. आम्ही अधिक गोल नोंदवू शकलो असतो, पण असो, संघाचे प्रयत्न आणि समर्पित भावना उच्च दर्जाची होती, असे म्हणावे लागेल.- शोर्ड मारिन, मुख्य प्रशिक्षक - भारत