नवी दिल्ली : नेदरलँडमधील ब्रेडा येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे २३ जून रोजी होणाºया सलामीच्या लढतीत आमने-सामने उभे ठाकणार आहेत.आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान या लढतीशिवाय अन्य दोन सामनेदेखील पहिल्या दिवशी होणार आहेत. ही स्पर्धा २३ जून ते एक जुलैदरम्यान रंगणार आहे. भारत वि. पाकिस्तान लढतीनंतर यजमान नेदरलँड अर्जेंटिना यांच्यात रोमांचक सामना होणार आहे.
भारत पाकिस्तान हॉकीत भिडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:22 IST