शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारत आशिया चॅम्पियन, मलेशिया पराभूत, विजयासाठी एका दशकाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 03:54 IST

अफलातून कामगिरी करणा-या भारतीय संघाने रविवारी अंतिम सामन्यात मलेशियाचा २-१ अशा गोलने पराभव करून आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली.

ढाका : अफलातून कामगिरी करणा-या भारतीय संघाने रविवारी अंतिम सामन्यात मलेशियाचा २-१ अशा गोलने पराभव करून आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली. विशेष म्हणजे तब्बल एका दशकानंतर भारताला आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घालता आली. भारताचे या स्पर्धेतील हे एकूण तिसरे विजेतेपद ठरले.याआधी २००३ मध्ये मलेशियातील क्वालालंपूर येथे प्रथम आशियाई चषक हॉकी स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतर २००७ साली मायदेशातील चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत भारत चॅम्पियन ठरला होता. २०१३ मध्ये मलेशियातील इपोह येथील स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अंतिम सामन्यात त्यांना दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला होता.आज मलेशियाविरुद्ध प्रथमच अंतिम सामन्यात खेळणाºया भारताने रमनदीपसिंहने केलेल्या तिसºया मिनिटाला आणि त्यानंतर ललित उपाध्याय याने २९ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर तिसºयांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानची बरोबरी साधण्यात यश मिळविले.या स्पर्धेत दक्षिण कोरियाने चार वेळेस आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली आहे. अंतिम सामन्यात मलेशिया संघाने भारताला अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. त्यांच्याकडून एकमेव गोल शाहरील सबाह याने ५० व्या मिनिटाला केला. जागतिक क्रमवारीतील ६ व्या क्रमांकावर असणाºया भारतासाठी अखेरचे दहा मिनिटे खूपच संघर्षपूर्ण ठरली. यादरम्यान मलेशियाने सातत्याने हल्लाबोल करताना भारतीय बचाव फळीला व्यस्त ठेवले. तथापि, भारतीय बचाव फळीनेदेखील जबरदस्त कामगिरी केली आणि मलेशियाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.विशेष म्हणजे आशिया खंडातील तीन महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. भारताने २०१४ मध्ये इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत फायनलमध्ये पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशी धूळ चारली आणि गतवर्षी कुआंटन येथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतही पाकिस्तानवर ३-२ असा विजय मिळविला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Hockeyहॉकी