शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

हॉकी विश्वचषक: आॅस्ट्रेलिया उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:22 IST

गतविजेत्या आॅस्ट्रेलिया संघाने इंग्लंड संघाचा ३-० गोलने पराभव करून हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली.

भुवनेश्वर : गतविजेत्या आॅस्ट्रेलिया संघाने इंग्लंड संघाचा ३-० गोलने पराभव करून हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली. दुसरीकडे चीन संघाने आयर्लंड संघाला १-१- गोल बरोबरीत रोखले.या विजयासह आॅस्ट्रेलियाने ब गटात सहा गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. मागील सामन्यात आॅस्ट्रेलियाने आयर्लंडला २-१ ने पराभूत केले होते. या पराभवामुळे इंग्लंडची चिंता वाढली आहे. इंग्लंडने चीनविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत राखला होता. आॅस्ट्रेलिया आपला शेवटचा सामना सात डिसेंबरला चीनविरुद्ध, तर इंग्लंडचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे.इंग्लंड व आॅस्ट्रेलिया सामन्याचा पूर्वार्ध खूपच संथ झाला. दोन्ही संघांकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले. मात्र गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या १२ व्या मिनिटाला इंग्लंडला, तर २१ व्या मिनिटाला आॅस्ट्रेलियाला गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती. मात्र यात यश मिळाले नाही. तिसऱ्या क्वार्टरमध्ये आॅस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र यातही गोल करण्यात अपयश आले. सामन्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांत मात्र आॅस्ट्रेलियाने खेळाचा नूरच पालटवून टाकला.आॅस्ट्रेलियाने चार मिनिटांत दोन गोल करीत २-० अशी आघाडी मिळवली. शेवटची चार मिनिटे शिल्लक असताना कोरे वेयेरने गोल करीत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली.

चीन-आयर्लंड लढत बरोबरीतचीन संघाने आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकाचे मानांकन असलेल्या आयर्लंड संघाला १-१ गोल बरोबरीत रोखले. चीन संघाला ४३ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जिन ग्यूने गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. पण चीनच्या खेळाडूंना या गोलचा आनंद जास्त वेळ साजरा करता आला नाही. आयर्लंडच्या एलन साऊदर्नने ४४ व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली.