शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मलेशियाचा ५-३ ने पराभव करत जर्मनीने निश्चित केला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 01:42 IST

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जर्मनीने विजयी घोडदौड कायम राखताना रविवारी चुरशीच्या लढतीत मलेशियाचा ५-३ ने पराभव केला.

भुवनेश्वर : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जर्मनीने विजयी घोडदौड कायम राखताना रविवारी चुरशीच्या लढतीत मलेशियाचा ५-३ ने पराभव केला. यासह ‘ड’ गटात अव्वल स्थान पटकावलेल्या जर्मनीने हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.जर्मनीने गटातील तिन्ही सामने जिंकत ९ गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या जर्मनीतर्फे टीम हर्जब्रुचने दुसऱ्या व ५९ व्या मिनिटाला आणि ख्रिस्टोफर रुहरने १४ व १८ व्या मिनिटाला गोल नोंदविले. त्याचप्रमाणे मार्को मिल्टकाऊने ३९ व्या मिनिटाला गोल केला. मलेशियातर्फे तिन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवले गेले. त्यात राजी रहीमने २६ व ४२ व्या मिनिटाला दोन तर नबील नूरने २८ व्या मिनिटाला एक गोल केला. या निकालासह जर्मनी संघ दोनदा जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलिया, ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना आणि यजमान भारत यांच्यासह उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला.आशियाई क्रीडा स्पर्धेमधील रौप्यपदक विजेता मलेशिया संघ ‘ड’ गटात केवळ एका गुणासह सुमार गोलसरासरीच्या आधारावर सध्या अखेरच्या स्थानी आहे. उभय संघांना या लढतीत गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या; पण जर्मनी संघाने गोल करण्यात बाजी मारली. जर्मनीने हर्जब्रुच व रुहर यांच्या कामगिरीच्या जोरावर १८ व्या मिनिटाला ३-० अशी आघाडी घेतली होती. पण, मलेशिया संघाने शानदार पुनरागमन केले. २८ व्या मिनिटाला रहीम व नूर यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर २-३ अशी पिछाडी भरून काढली. जर्मनी संघाने मलेशियाच्या कमकुवत बचावाचा लाभ घेतला. मिल्टकाऊने ३९ व्या मिनिटाला निकलस वालेनच्या पासवर गोल नोंदवला. मलेशियाने रहीमच्या गोलच्या जोरावर अंतर ३-४ असे केले. शेवटी जर्मनीने वर्चस्व कायम राखताना मिल्टकाऊने अखेरच्या मिनिटाला गोल नोंदविल्यामुळे मलेशियाच्या पुनरागमन करण्याच्या आशा मावळल्या. मलेशियाला या लढतीत ८ पेनल्टी कॉर्नर तर जर्मनीला ७ पेनल्टी कॉर्नर मिळाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Germanyजर्मनीMalaysiaमलेशियाHockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धा