शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नऊ वर्षांनंतरही सविता नोकरीच्या प्रतीक्षेत, सरकारकडून मिळाले केवळ आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:21 IST

बलाढ्य चीनला नमवून १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ‘हॉकी इंडिया’ने प्रत्येकी एक लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले खरे

नवी दिल्ली : बलाढ्य चीनला नमवून १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ‘हॉकी इंडिया’ने प्रत्येकी एक लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले खरे, परंतु भविष्याच्या दृष्टीने गोलरक्षक सविता पूनिया हिच्यासाठी ही रक्कम पुरेशी नाही. याला कारण म्हणजे, नऊ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतरही सविता नोकरीच्या शोधात आहे.भारताला आशिया चषक मिळवून देण्यात निर्णायक कामगिरी बजावलेल्या सविताच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाली. परंतु, अजूनही तिचा नोकरीचा शोध थांबलेला नाही. २००८मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केलेल्या सविताने जपानच्या काकामिगहरा येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत कारकिर्दीतील १५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दिवंगत आजोबा महिंदर सिंग यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हॉकी खेळण्यास सुरुवात केलेल्या सविताने आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने अनेकदा चमकदार कामगिरी करताना भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, इतके यश मिळवूनही तिला नोकरीने मात्र हुलकावणी दिली.जपानहून भारतात परतल्यानंतर हरियाणाच्या सविताने म्हटले की, ‘‘माझे वय आता २७ वर्षे होणार असून, गेल्या नऊ वर्षांपासून मी नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. हरियाणा सरकारच्या ‘पदक आणा, नोकरी मिळवा’ योजनेंतर्गत मला आशा होती. परंतु, नेहमी मला आश्वासनेच मिळाली.’’ २०१३मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही मलेशियाविरुद्ध दोन महत्त्वपूर्ण पेनल्टी वाचवून सविताने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. सविताचे वडील फार्मासिस्ट असून, आपल्या खर्चासाठी सविता वडिलांवरच अवलंबून आहे.‘‘मी नऊ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळत असून, आजही मी स्वत:च्या खर्चासाठी आई-वडिलांवर अवलंबून आहे. खरं म्हणजे या वयामध्ये मला त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळेच दरवेळी माझ्या मनात एकच विचार सुरूअसतो, की माझ्याकडे नोकरी नाही. असे असले तरी या गोष्टीचा मी माझ्या कामगिरीवर परिणाम होऊ देत नाही. मात्र, प्रत्येक यशानंतर एका आशा असते. हे चक्र अनेक वर्षांपासून सुरूच आहे,’’ अशी खंतही सविताने मांडली.आशिया चषक पटकावणे खरंच खूप मोठे यश आहे. रिओ आॅलिम्पिक पात्रतेनंतर माझ्या कारकिर्दीतील हे सर्वांत मोठे यश आहे. आपले क्रीडामंत्री स्वत: आॅलिम्पिकपदक विजेते आहेत आणि मला विश्वास आहे,की ते माझी परिस्थिती समजून घेतील आणि मला नोकरी मिळेल. आशिया चषक पटकावल्यानंतर भारतात महिला हॉकीचा खूप प्रसार होईल. यामुळे मुली मैदानात नक्की येतील याची खात्री आहे. आम्ही आमच्या मेहनतीवर विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला असून, भविष्यात याच कामगिरीची आम्ही पुनरावृत्ती करु.- सविता पूनिया