शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

रेल्वे ट्रॅकवर आढळला महिला हॉकीपटूचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 23:59 IST

भारतीय महिला हॉकी संघातील 20 वर्षीय ज्योती गुप्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्टार खेळाडू म्हणून उदयास येऊ पाहणा-या ज्योती गुप्ताचा मृतदेह हरियाणामधील रेवारी येथे रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने खळबळ उढाली.

गुरुग्राम, दि. 04 : भारतीय महिला हॉकी संघातील 20 वर्षीय ज्योती गुप्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्टार खेळाडू म्हणून उदयास येऊ पाहणा-या ज्योती गुप्ताचा मृतदेह हरियाणामधील रेवारी येथे रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने खळबळ उढाली. चंदिगड - जयपूर इंटरसिटी एक्स्प्रेसच्या चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे ज्योती गुप्ताने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ज्योती गुप्ताने भारतीय महिला राष्ट्रीय हॉकी संघाचं नेतृत्व केलं होतं. तिचा खेळ पाहता भविष्यात एक मोठी खेळाडू म्हणून ती नावारुपाला येईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती.अचानक ट्रेनसमोर उडी मारली असल्याने ज्योती गुप्ता ट्रेनखाली आली असल्याचं रेल्वे चालकाने सांगितलं आहे. रेवारी स्थानकाजवळ रात्री 8:30 वाजता झज्जर रोड पुलावरुन जात असताना अचानक ज्योती गुप्ता ट्रेनसमोर आली. यानंतर चालकाने रेल्वे पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शोध घेतला असताना ज्योती गुप्ताचा मृतदेह आढळला. ज्योती गुप्ता ट्रेनसमोर आल्यानंतर चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र ती इतक्या जवळ होती की तोपर्यंत ट्रेन थांबणं शक्य नव्हतं, अशी माहिती रेल्वे पोलीस अधिकारी रणवीर सिंग यांनी दिली आहे.ज्योतीने सर्वात शेवटचा फोन कॉल आपल्या सोनपतमधील घरी गेला होता. रात्री 7 वाजता फोन करुन बस खराब झाली असल्याने उशीर होईल असं तिने घरी सांगितले होते. इतका उशीर होऊनही ज्योती घरी आली नाही म्हणून रात्री 10.30 वाजता तिच्या आईने फोन केला असता रेल्वे पोलिसांनी त्यांच्याशी बातचीत करत मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.