शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

'संवादहीनता संपली, अडथळा नाहीच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 03:04 IST

भारतीय हॉकी संघातील वरिष्ठ खेळाडू सरदार सिंग आणि मनप्रीतसिंग यांनी प्रशिक्षक विदेशी नसल्यामुळे संवाद साधण्यात अडथळे उद्भवणार नाही.

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघातील वरिष्ठ खेळाडू सरदार सिंग आणि मनप्रीतसिंग यांनी प्रशिक्षक विदेशी नसल्यामुळे संवाद साधण्यात अडथळे उद्भवणार नाही. हरेंद्रसिंग हे विदेशी प्रशिक्षकाच्या तुलनेत डावपेच आखण्यात कुठेही कमी नसल्याचे म्हटले आहे.हरेंद्रसिंग यांची मे महिन्यामध्ये पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या उपस्थितीत मागच्या महिन्यात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद पटकविले. वृत्तसंस्थेशी बोलताना सरदार म्हणाला,‘१५-१६ वर्षांपूर्वी हरेंद्र यांनी मला राष्टÑीय शिबिरात पाचारण केले होते, हे अद्याप स्मरणात आहे. आम्ही दीर्घ काळापासून एकमेकांना जाणतो. २००९ मध्ये जोस ब्रासाचे सहायक असताना मी हरेंद्र यांच्या मार्गदर्शनात खेळलो आहे. भारतीय प्रशिक्षकासोबत काम करणे वेगळी अनुभूती आहे. आम्ही त्यांच्यासोबत कुठल्याही विषयावर बोलू शकतो आणि ते देखील मोकळेपणाणे सल्ला देऊ शकतात. सिनियर खेळाडू या नात्याने आम्ही स्वत:चा खेळ पूर्णपणे बदलू शकत नाही. सरावादरम्यान काही समजाविण्यास कोचकडे वेळ असतो. विदेशी कोच दोन क्वार्टरच्या मध्ये दोन मिनिट ब्रेक दरम्यान सल्ला देतो. हा सल्ला समजणे कठीण असते. हरेंद्र यांच्या नियुक्तीमुळे भाषेचा प्रश्न देखील संपुष्टात आला आहे.’सरदार पुढे म्हणाला, ‘हरेंद्र यांनी महिला आणि ज्युनियर संघांसोबत चांगले निकाल दिले आहेत. ज्युनियर संघाने विश्वचषक तर त्यांच्याच मार्गदर्शनात जिंकला. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांसोबत त्यांनी काम केले आहे. सकारात्मक बाब अशी की आता आम्ही हिंदीत संवाद साधू शकतो. विदेशी कोचसोबत दोन मिनिटे चर्चा केल्यानंतर मैदानात काही मुद्दे विसरले की भ्रमिष्ट स्थिती होते. प्रशिक्षक बाहेरून खेळ पाहतो आणि स्वत:च्या भाषेत मार्गदर्शन करतो. त्यांची भाषा आणि तुमची भाषा वेगळी असल्याने ताळमेळाअभावी चुका होतात. हरेंद्र यांच्या उपस्थितीमुळे आता भीती नाहीशी झाली आहे.’ >शैली न बदलण्याची प्रशिक्षकाला अपेक्षामनप्रीत म्हणाला, ‘नव्या प्रशिक्षकासह खेळताना खेळाडूंनी खेळाची शैली बदलू नये अशी प्रशिक्षकाला अपेक्षा असते. आमची ताकद हल्ले करणे व प्रतिस्पर्धी खेळाडूंना रोखून धरणे आहे. हरेंद्र यांना सुनील व आकाशदीपसारख्या खेळाडूंच्या वेगवान खेळाचा उपयोग कसा करायचा हे माहिती आहे. विशेष म्हणजे मोठमोठ्या प्रशिक्षकांसोबत काम केल्यानंतरही ‘मी तर अद्याप शिकत आहे, हे हरेंद्र यांचे उद्गार ते अद्याप जमिनीवर असल्याची साक्ष देतात.’

टॅग्स :Hockeyहॉकी