शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आशिया चषक हॉकी :भारतीय महिलांची विजयी ‘हॅट्ट्रिक’, मलेशियाचा २-० असा केला पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:46 IST

तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने सलग तिसरा विजय मिळवताना मलेशियाचा २-० असा पाडाव करुन आशिया चषक हॉकी स्पर्धेत जबरदस्त आगेकूच केली.

काकामिगहरा (जपान) : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने सलग तिसरा विजय मिळवताना मलेशियाचा २-० असा पाडाव करुन आशिया चषक हॉकी स्पर्धेत जबरदस्त आगेकूच केली. पहिले तीन क्वार्टर्स गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर अंतिम क्वार्टरमध्ये निर्णायक दोन गोल नोंदवत भारताने बाजी मारली.या शानदार विजयासह भारतीय संघाने सर्वाधिक ९ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. याआधी झालेल्या सामन्यात भारताने चीनचा ४-१ असा एकतर्फी पाडाव करत शानदार विजय मिळवला होता. मलेशियाविरुध्द वंदना कटारियाने ५४व्या मिनीटाला आणि गुरजीत कौरने ५५व्या मिनीटाला गोल करुन भारताचा विजय साकारला.पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ करताना धोका पत्करला नाही. मलेशियाने अधिक बचावात्मक पवित्रा घेतला. त्याचवेळी, भारताने कोणतीही घाई न करता अखेरपर्यंत संधी मिलण्याची प्रतीक्षा केली आणि मोक्याच्यावेळी आपला हिसका देत सामना जिंकला.त्याचवेळी, दुसºया क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच मलेशियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र रजनी इतिमार्पू हिने मलेशियाला गोल करण्यापासून रोखले. यानंतर दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र गोल करण्यात कोणालाही यश आले नाही. तिसºया क्वार्टरमध्येही मलेशियाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे ते दडपणाखाली आले.चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने चित्र पालटले. वंदनाने ५४व्या मिनिटाला मलेशियाच्या क्षेत्रात मुसंडी मारताना शानदार मैदानी गोल करत संघाला आघाडीवर नेले. यानंतर पुढच्याच मिनिटाला मिळालेली पेनल्टी कॉर्नर ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरने सत्कारणी लावत भारताचा दुसरा गोल साकारला. अखेरपर्यंत भारताने २-० ही आघाडी कायम राखताना विजयाची नोंद केली.

टॅग्स :Hockeyहॉकी