शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चे शिष्टमंडळ जिल्हा कचेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:12 IST

जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ५0५४ या लेखाशिर्षाच्या निधीचा प्रश्न घेऊन शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना भेटले. या शिष्टमंडळाने नेमक्या कोणत्या मागण्या मांडल्या याचा तपशील मिळाला नसला तरीही या निधीचे नियोजन हाच प्रमुख प्रश्न होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ५0५४ या लेखाशिर्षाच्या निधीचा प्रश्न घेऊन शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना भेटले. या शिष्टमंडळाने नेमक्या कोणत्या मागण्या मांडल्या याचा तपशील मिळाला नसला तरीही या निधीचे नियोजन हाच प्रमुख प्रश्न होता.जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेली रस्त्यांची लांबी जास्त असतानाही त्यातुलनेत निधी मिळत नाही. कसातरी ५0५४ या लेखाशिर्षांतर्गत निधी जि.प.कडे वर्ग झाला असल्याने सदस्यांच्या आशांना पंख फुटले होते. आपल्या सर्कलमधील एका गावाचा तरी रस्ता चकाचक होईल, ही अपेक्षा बाळगून होते. मात्र पहिल्यांदा निधी मंजूर झाला तेव्हा १.९८ लाखांच्या कामांची यादीच सोबत आली अन् या आशेवर पाणी फेरले गेले. आता नव्याने या लेखाशिर्षावर ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र जिल्हा नियोजन समितीत यावर बोलूही दिले जात नसल्याने अखेर काही अधिकाऱ्यांना विचारणा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. तर नियोजनही जि.प.नेच करायचे असते, असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही नियोजन होत नसल्याने हे शिष्टमंडळ भेटले.यामध्ये जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती भैय्या देशमुख, प्रल्हाद राखोंडे, अ‍ॅड. गयबाराव नाईक, अंकुश आहेर, विठ्ठल चौतमल, बालासाहेब मगर, भानुदास जाधव, नंदकिशोर खिल्लारे आदींचा समावेश होता. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली असली तरीही यातील चर्चेबाबत कोणीच काही बोलायला तयार नव्हते. एकंदर या रस्त्यांचे नियोजन वेळेत झाल्यास पुढील कामे वेळेत करणे सुकर होणार असल्याने निर्णय लवकर होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली