शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

जि.प.चा गाडा रुळावर येतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:26 IST

जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या निधी खर्चातील बाह्य हस्तक्षेपाचे काटे एकदाच दूर होणे शक्य नसले तरीही त्यातून मार्ग काढून गाडी रुळावर येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेत्यांशी संवादाचा पूल उभारण्याचा फंडा आता उपयोगी ठरत असल्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या निधी खर्चातील बाह्य हस्तक्षेपाचे काटे एकदाच दूर होणे शक्य नसले तरीही त्यातून मार्ग काढून गाडी रुळावर येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेत्यांशी संवादाचा पूल उभारण्याचा फंडा आता उपयोगी ठरत असल्याची चिन्हे दिसत आहेत.जिल्हा परिषदेत गतवर्षी समाजकल्याणच्या दलित वस्ती सुधार योजनेत पंचवार्षिक आराखड्यातील शेवटचे वर्ष असल्याने पदाधिकाºयांनी काही प्रमाणात बाह्य हस्तक्षेपासमोर नांगी टाकली होती. मात्र निधी दिल्यानंतरही निधी अडविण्याचे धोरण राबविले गेल्याने पदाधिकारी व सदस्यही त्रस्त होते. त्यातच ३0५४ व ५0५४ ला तर पालकमंत्र्यांच्या समितीसमोर सादर करणे बंधनकारक झाले होते. आता न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिल्याने पुन्हा जिल्हा परिषदेकडेच या निधीचे नियोजन आले आहे. तरीही यात काही अडचणी असल्याने पेच कायम होता. यामुळे समाजकल्याणसह रस्त्याचाही निधी गतवर्षीपासून अखर्चित होता. आता यातील अडचणीही दूर झाल्यातच जमा असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यातही जि.प. पदाधिकाºयांनी एक पाऊल मागे घेतल्यानेच निर्णय होत असल्याचे सांगितले जात आहे. दलित वस्तीचा गतवर्षीचा २६ कोटींचा निधी सर्व तयारी झालेली असताना पडून आहे. हा निदी खर्च न झाल्याने यंदाचा २0 कोटी रुपयांचा निधी मागणे अवघड झालेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी पडून राहिला तर आगामी काळात निवडणुकांमुळे तो खर्च करणेच शक्य नव्हते. आता यातील अडचणी दूर होताच नियोजनाकडे वाटचाल सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी बाह्यशक्तींना स्थानच द्यायचे नाही. जर या शक्तींनी डोके वर काढले तर त्या पक्षाच्या सदस्यांचा वाटा कमी करण्याचा नवा फंडा समोर येत आहे.शासनाकडून नियमितपणे मंजूर निधीवर कुणालाही डल्ला मारू दिला जाणार नाही. वाढीव निधी आणल्यास तो संबंधितांनीच खर्च केल्यास कोणाचीच नाराजी नसल्याचेही सांगितले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये जि. प. सदस्यांची डोकेदुखी मागे लागू नये म्हणून यापुढे कोणी विरोध करेल, अशी शक्यता धूसर बनली आहे. मात्र सदस्यांनी एकजुटीने लढा दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. असे असले तरीही विविध विभागांचा कोट्यवधींचा निधी पडून असून त्याकडेही लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. या निधीकडे मात्र ना पदाधिकाºयांचे लक्ष आहे ना सदस्यांचे. केवळ निविदांच्या कामाकडे लक्ष देवून वैयक्तिक लाभाच्या योजनांकडे दुर्लक्ष होत असेल तर तेही चुकीचे आहे. मात्र बहुतांश योजना या वैयक्तिक लाभाच्या असून अशांचाच निधी खर्ची होत नाही. सार्वजनिक सेवांच्या निधीचीही हीच काही प्रमाणात बोंब आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद