शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जि.प. सदस्य देणार धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:33 IST

पंचायत राज व्यवस्थेला मूठमाती देत आपल्याच पदरात सगळे पाडून घेण्याचा घाट विधिमंडळ व संसद सदस्य करु लागल्याची तिखट प्रतिक्रिया जि.प. पदाधिकारी व सदस्यांच्या झालेल्या बैठकीत ऐकायला मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पंचायत राज व्यवस्थेला मूठमाती देत आपल्याच पदरात सगळे पाडून घेण्याचा घाट विधिमंडळ व संसद सदस्य करु लागल्याची तिखट प्रतिक्रिया जि.प. पदाधिकारी व सदस्यांच्या झालेल्या बैठकीत ऐकायला मिळाली.जि.प.तील या बैठकीस जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, बाबा नाईक, भानुदास जाधव, गटनेते अंकुश आहेर, मनीष आखरे आदींची उपस्थिती होती. सर्वपक्षीय सदस्य बैठकीत दिसत होते. घटनादुरुस्तीनंतर पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी ज्या बाबी जि.प.कडे सुपूर्द केल्या. त्यातील अनेक बाबी हळूहळू राज्य शासनाने पुन्हा आपल्या अखत्यारितल्या विभागांना वर्ग केल्या. अजूनही हा प्रकार थांबलेला नाही. आता तर बांधकाम विभागाला मिळणारा ३0५४ व ५0५४ या लेखाशिर्षांचा निधी नुसता नावालाच जि.प.कडे ठेवला आहे. नियोजन मात्र हिसकावले आहे. मग या सभागृहाची गरजच काय? असा सवाल सदस्यांनी केला. मिनी मंत्रालय म्हणून जि.प.ला मोठेपण द्यायचे, जि.प.च्या अध्यक्षांना राज्यमंत्री दर्जा असल्याचे सांगायचे अन् याच संस्थेवर अविश्वास दाखवायचा, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्य शासन अथवा विधिमंडळ, संसद सदस्य जि.प.च्या अधिकारावरच गंडांतर आणण्याचा चंग बांधून असतील तर त्यांना निवडणुकांत आमची किंमत दाखवून देवू, असा इशाराही सदस्य आक्रमकपणे दिसत होते.विशेष म्हणजे दलित वस्तीच्या कामांनाही आराखड्याचे शेवटचे वर्ष असताना तक्रारी करून ब्रेक लावल्याची नाराजीही पोटतिडकीने मांडली जात होती. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी कायदेशीर लढा देण्याचाही निर्णय घेण्यात आला. तर याबाबत ३0 आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या आंदोलनात पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय सदस्य सहभागी असल्याचे दिसून येत आहे.नूर पालटला : स्वकीयांचीही नाराजीया बैठकीत काही सदस्यांनी अगदी पोटतिडकीने निवडणुकीत केलेल्या कामांचा वरिष्ठ लोकप्रतिनिधींना विसर पडत असेल तर आगामी निवडणुकांमध्ये आपणही हे विसरले पाहिजे, असे मांडले. तर स्वकीयांविरोधात रणांगणात उतरण्याची वेळ आली तरीही मागे हटायचे नाही. यापूर्वी कधीच कोणत्या लोकप्रतिनिधींनी जि.प.तील आपल्या भावंडांना त्रास दिला नाही. लहान भाऊ म्हणूनच सांभाळले. मात्र ही मंडळी वाºयावर सोडत असेल तर आम्हीही भावकीची भिंत उभी करायला काय हरकत? असा सवाल केला.मागील अनेक दिवसांपासून जि.प.पदाधिकारी व सदस्य त्यांच्या अधिकारांवर गंडांतर येत असल्याने नाराज होते. मात्र ती खदखद व्यक्त करण्यासाठी आजच्या बैठकीत व्यासपीठ मिळाले. त्यामुळे अनेकजण यात खुल्या दिलाने व्यक्त झाल्याचे दिसले.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदMorchaमोर्चा