शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.त सत्ताधाऱ्यांसमोरच पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:34 IST

जिल्हा परिषदेत आधीच पार मंत्री स्तरावरून वाढत चाललेल्या हस्तक्षेपामुळे सदस्य मंडळी जर्जर आहे. त्यातच काही ठिकाणी अनावश्यक वाद वाढत चालल्याने भविष्यात सत्तेत राहून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत आधीच पार मंत्री स्तरावरून वाढत चाललेल्या हस्तक्षेपामुळे सदस्य मंडळी जर्जर आहे. त्यातच काही ठिकाणी अनावश्यक वाद वाढत चालल्याने भविष्यात सत्तेत राहून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.काँग्रेस व राष्ट्रवादीच्या टेकूवर जि.प.चे अध्यक्षपद बळकावलेल्या शिवसेनेने काँग्रेसलाच पाण्यात पाहण्याची भूमिका घेतल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून होत आहे. आधी किरकोळ असणारा हा वाद नंतर पराकोटीचा वाढण्यामागे विधानसभा निवडणुकीची किनार आहे. एकतर जि.प.त मंत्री, आमदारांचा हस्तक्षेप वाढत असल्याने जि.प.ची मंडळीही त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला हवा देण्याचे काम काही बाह्यघटक करीत आहेत. मात्र जि.प. पदाधिकाºयांनी कधी या मंडळींना यात लक्ष न घालण्यासाठी विनवले नाही. विशेष म्हणजे आमदार मंडळीही आमच्या कामात हस्तक्षेप होत असल्याचे सांगत असल्याने दोन्ही हातांनी टाळी वाजत असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषदेत काल घडलेल्या प्रकारानंतर तर आता युतीतील घटक पक्षांत पडलेली ठिणगी नवे पेच उभे करणारी दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या आखणीनुसार भविष्यात पेच निर्माण होणे अपरिहार्य दिसत आहे. यात भाजपची भूमिका मात्र महत्त्वाची राहणार आहे.या घटनेनंतर काँग्रेसचे आ.संतोष टारफे यांनी शिवसेना दादागिरी करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याला भिक घालणार नसल्याचे सांगितले. तर विकासकामे केल्याने मते मिळतात. दादागिरीने नव्हे, याचे भान सेनेच्या कार्यकर्त्यांना राहिले नसल्याचे ते म्हणाले. तर सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सेनेला सत्तेचा मोह नाही. मात्र आमच्या कार्यकर्त्यांची जाणीवपूर्वक अडवणूक खपवून घेतली जाणार नसल्याचे म्हटले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीzpजिल्हा परिषद