शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

हिगोली जिल्ह्यात २,२४० सिंचन विहिरींची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 15:10 IST

हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मंजूर सिंचन विहिरींच्या कामांना ब्रेक लागला होता.

ठळक मुद्दे३,५१७ कामे प्रगतिपथावर ७,१४७ विहिरींना प्रशासकीय मान्यता

हिंगोली : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात २ हजार याप्रमाणे १० हजार सिंचन विहिरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार १४७ विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यातून २ हजार २४० विहिरींची कामे आतापर्यंत पूर्ण झाली असून ३ हजार ५१७ कामे प्रगतीपथावर आहेत; तर १ हजार ३९० विहिरींच्या कामांना प्रारंभ केला जाणार आहे. 

हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मंजूर सिंचन विहिरींच्या कामांना ब्रेक लागला होता. ऑक्टोबर अखेरपासून मात्र ही कामे पुन्हा सुरू झाली आहेत. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील १ हजार ६५५ विहिरींना मंजुरी मिळाली आहे. वसमतमध्ये ९८४, हिंगोलीत १ हजार ६६७, कळमनुरीत १ हजार ३९७ आणि सेनगाव तालुक्यात १ हजार ४४४ अशा एकंदरित ७ हजार १४७ विहिरींना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत २ हजार २४० कामे पूर्ण झाली असून ३५१७ कामे प्रगतीपथावर आहेत. औंढा तालुक्यातील २७, वसमत ३८, हिंगोली ७१, कळमनुरी २३ आणि सेनगाव तालुक्यातील ३१ अशा एकूण १९० सिंचन विहिरींचा १९७.८७ लाखांचा निधी शासनाकडे प्रलंबित असून त्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :HingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी