शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

वाघजळीत गॅस्ट्रोने महिला दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:56 IST

तालुक्यातील वाघजाळी येथे मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे.२0 ते २५ जणांना याची लागण झाली आहे. यामुळेच गुरुवारी रात्री एक महिला दगावल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील वाघजाळी येथे मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे.२0 ते २५ जणांना याची लागण झाली आहे. यामुळेच गुरुवारी रात्री एक महिला दगावल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.तालुक्यातील वाघजाळी येथे दूषित पाणी व घाणीच्या साम्राज्याने तीन दिवसांपासून गॅस्ट्रोबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गावात जुलाब व उलट्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने ५ जुलै रोजी गॅस्ट्रोच्या आजाराने गीताबाई तांबिले (५०) या महिलेचा मृत्यू झाला आहे.गावातील २0 ते २५ जणांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामध्ये गौकर्णा बाबाराव तांबिले (३०), कल्पना ध्रुव तांबिले (२५), भागवत काशीराम तांबिले (३६), माधव सोनुने (४२), हरिदास अवचार (४६) यांच्यासह अनेक रुग्णांना गॅस्ट्रो झाला आहे. काहींनी सेनगाव, रिसोड, हिंगोली आदी ठिकाणची खाजगी रुग्णालये जवळ केली आहेत.आरोग्य उपकेंद्र कुलूपबंदचएक महिला दगावली तरीही आरोग्य विभाग बेफिकीर आहे. गावातच प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र बंद आहे. मात्र येथे एकही आरोग्य कर्मचारी कार्यरत नसल्याने ते कुलूपबंद आहे. अआरोग्य विभागाची कोणतीही यंत्रणा मदतीसाठी उपलब्ध नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगत आहेत. त्याचबरोबर वेळेवर उपचार मिळाले असते तर महिलेला वाचवता आले, असते अशी खंत ओमप्रकाश तांबिले यांनी व्यक्त केली. यासंबधी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांच्याशी संपर्क साधला गावात ७ जुलै रोजी साखरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक पाठविले असून बाधित रुग्णांवर उपचार तातडीने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य