शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

‘जलेश्वर’ तलावाच्या काठची अतिक्रमणे हटविणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 19:13 IST

शहरातील जलेश्वर तलाव सुशोभीकरण

ठळक मुद्देअस्वच्छ पाणी मंदिरात शिरत असल्याच्या तक्रारी

हिंगोली : जलेश्वर तलावाच्या काठावरील अतिक्रमणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून याबाबत १० फेबु्रवारी रोजी परत एक बैठक पार पडली.  नोटिस बजावूनही अतिक्रमण हटविले जात नसल्याने आता महसूल प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाणार आहे. याठिकाणी अतिक्रमण केलेल्या जवळपास १९५ घरांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे.हिंगोलीतील जलेश्वर तलाव सुशोभिकरणासाठी नगरपालिकेकडून हालचाली सुरू आहेत. परंतु शुशोभिकरणासाठी तलावाच्या काठावरील अतिक्रमणाचा अडसर येत असून अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नोटिसाही पाठविल्या आहेत. परंतु अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यानंतर अतिक्रमणधारकांसाठी जागा खरेदी करून त्यांना घरकुल योजनेतून लाभ दिला जाईल, असे वेळोवेळी आश्वासनही नगरपालिकेकडून देण्यात आले होते. जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तसा पालिकेने प्रस्तावही पाठविला आहे. परंतु सदर प्रस्ताव थंड बस्त्यातच आहे. मात्र आता महसूल प्रशासनाकडून जलेश्वर तलावाकाठावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जलद गतिने हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. नुकतीच अतिक्रमण हटविण्याबाबत बैठक पार पडल्याने आता प्रत्यक्षात कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आहे. तलावाकाठावरील अतिक्रमण हटविले जाणार असल्यामुळे मात्र ‘आम्ही जावे तरी कुठे?’ असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आ. तान्हाजी मुटकुळे आणि नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांची भेट घेतली होती. यावेळी जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. जलेश्वर तलाव सुशोभिकरणात अतिक्रमणामुळे अडथळा होत असल्याने येथील विकासकामे रखडली आहेत.  हिंगोली येथील जलेश्वर तलावाच्या विकासाकरीता अतिक्रमण हटविणेबाबत महाराष्टÑ जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार कार्यवाही केली जाणार आहे. अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावे याबाबत हिंगोली येथील तहसीलदारांनी १९५ अतिक्रमणधारक कुटुंबांना नोटीस दिली. परंतु अद्याप अतिक्रमण हटले नसल्याने आता महसूल प्रशासन येथील घरांवर बुलडोजर चालविणार आहे. त्यामुळे येथील शेकडो नागरिक बेघर होणार आहेत. नव्यानेही अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली. ही अतिक्रमणेही हटविणे तेवढेच गरजेचे आहे.‘त्या’ ठरावाची चर्चाया अतिक्रमणग्रस्तांना हक्काचे घर मिळावे, यासाठी न.प.ने जागा भूसंपादन करण्याची निविदा मागविली होती. मात्र त्यापेक्षा कमी दरात शहरात जागा मिळू शकते. त्यामुळे या ठरावास विरोध झाला होता. तरीही हाच ठराव पुढे रेटल्याचा आरोप होत असून भविष्यात पुन्हा विरोधाची शक्यता दिसत आहे.बेघर झाल्यावर आम्ही जावे कुठे ? येथील तलावाकाठावर मागील ३० ते ४० वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु प्रशासनाकडून नोटीस पाठविल्याने आम्ही बेघर झाल्यास जावे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अतिक्रमण धारकांच्या जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नगरपालिकेकडून प्रस्ताव पाठविला आहे. जे जुने अतिक्रमणधारक आहेत त्यांचा विचार केला जाणार आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले. तर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे म्हणाले, जलेश्वर तलावकाठावरील महसूलच्या जागेतील अतिक्रमण लवकरच हटविले जाणार आहे. संबंधितांना वारंवार नोटीस देऊनही त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यांना नेहमी संधी देण्यात आली होती. मात्र अद्याप स्वत:हून कोणी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे आता नियमानुसार संबंधित यंत्रणेद्वारे लवकरच अतिक्रमण हटविले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमणWaterपाणी