लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ४० पाणवठ्यांवरून ३० एप्रिल रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात येत असल्याची माहिती वन विभागाने दिली.वाढत्या मानवी वस्त्यांमुळे जंगल कमी होत चालले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या जंगल परिक्षेत्रात किती प्राणी आहेत, कोणत्या प्राण्यांची संख्या जास्त आहे याचे निरीक्षण करण्यासाठी वन विभागातर्फे बुद्ध पौर्णिमेला नियोजन केले जाते. जिल्ह्यातील औंढा, सेनगाव हिंगोली व वसमत या चार ठिकाणच्या जंगल परिक्षेत्रात वन खात्याच्या वतीने प्राण्यांची गणना करण्यात येत आहे. वन्यप्राणी गणनेसाठी नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी वन विभागाच्या २ कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पाठविल्याची माहिती विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.पाणवठ्यावर रात्री पहारा देऊन पाणी पिण्यासाठी येणाºया प्राण्यांचे माहिती वनकर्मचारी नोंदविणार आहेत. त्यानंतर सर्व कर्मचाºयांची माहिती एकत्रीत करून जंगल परीक्षेत्रातील वन्यप्राण्यांची आकडेवारीचा अंदाज काढला जाणार आहे. हिंगोली जंगल परिक्षेत्रात सर्वाधिक आढळणाºया प्राण्यांमध्ये नीलगाय, रानडुक्कर काही ठिकाणी काळवीट आढळुन येतात. या सर्व प्राण्यांची नोंदी केल्या जाणार.
४० पाणवठ्यांवरून वन्य प्राण्यांची गणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:39 IST