शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

हिंगोलीत होलसेल किराणा दुकानाला आग; लाखों रूपयांचे नुकसान

By रमेश वाबळे | Updated: October 21, 2022 12:32 IST

पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुकानातून धुर निघत असल्याचे रामलिला मैदानावरील आकाशपाळणे व्यावसायिकांना दिसून आले.

हिंगोली : शहरातील रामलिला मैदान भागातील एका होलसेल किराणा दुकानाला आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. 

हिंगोली शहरातील रामलिला मैदानाच्या परिसरात शोएब कच्छी यांचे होलसेल किराणा दुकान आहे.  किराणा साहित्यासोबतच इतर कटलरी साहित्य विक्री केले जाते. २० ऑक्टोबरच्या रात्री नेहमी प्रमाणे कच्छी हे दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुकानातून धुर निघत असल्याचे रामलिला मैदानावरील आकाशपाळणे व्यावसायिकांना दिसून आले. त्यांनी तातडीने या प्रकाराची माहिती इतर नागरीकांना दिली. मात्र, बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. दुकानाच्या खिडक्यांमधून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह अग्नीशमनदलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आग भडकल्याने तातडीने सेनगाव, कळमनुरी, वसमत येथील अग्नीशमनदलास पाचारण करण्यात आले. या अग्नीशमन दलाचे पथक तसेच नागरीकांच्या मदतीने तब्बल दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तो पर्यत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. शार्ट सर्कीटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग