शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कार करायचे कुठे? हिंगोली जिल्ह्यात १५६ गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्थाच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:47 IST

अनेक गावांमधील स्मशानभूमीत टिनशेडची दुरवस्था

ठळक मुद्देपावसाळ्यात होतेय मोठी गैरसोय प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

- सुनील काकडे

हिंगोली : जिल्ह्यात ७११ गावे आहेत. त्यातील तब्बल १५६ गावांमध्ये अद्याप स्मशानभूमीची व्यवस्थाच उभी झालेली नाही. त्यामुळे मृतकांवर अंत्यसंस्कार नेमके करायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. शेतांमध्ये उघड्यावर चिताग्नी दिला जातो; मात्र पावसाळ्यात सरणावर पाणी पडून ते वारंवार विझण्याचा प्रकार घडतो. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ज्या गावांमध्ये स्मशानभूमी आहे, त्यातीलही अनेक ठिकाणच्या स्मशानभूमीतील टिनशेडची दुरवस्था झाली आहे. 

हिंगोली तालुक्यात ४३, सेनगाव तालुक्यातील २५, वसमत ३२, औंढा नागनाथ २६ आणि कळमनुरी तालुक्यातील ५० गावांमध्ये आजही स्मशानभूमीची व्यवस्था उपलब्ध झालेली नाही. परिणामी, गावातील कुणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करताना विविध अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्यात हा त्रास अधिकच बळावतो. प्रशासकीय यंत्रणेने ही बाब लक्षात घेता सुविधांयुक्त  स्मशानभूमी उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.

मु.पो. सवना, ता. सेनगावसेनगाव तालुक्यातील सवना या गावात बौद्ध आणि बंजारा समाजासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आलेली आहे; मात्र हिंदू समाजबांधवांकरिता अद्याप ही सुविधा उपलब्ध झालेली नाही. काही महिन्यांपूर्वी या समाजासाठी स्मशानभूमीची जागा आरक्षित करण्यात आली आहे. असे असले तरी त्याठिकाणी टिनशेड किंवा बैठक व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. यामुळे विशेषत: पावसाळ्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सर्वधर्मियांकरिता स्मशानभूमी उभारण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; परंतु दुर्लक्ष करण्यात आले.

मु.पो. अंभेरी, ता. हिंगोलीहिंगोली तालुक्यातील अंभेरी येथे एकाठिकाणी मुस्लिम समाजबांधवांसाठी स्मशानभूमीची थोडीफार जागा उपलब्ध करून देण्यात आली. हा अपवाद वगळता अन्य समाजांकरिता आजही स्मशानभूमीची कुठलीच सोय उपलब्ध नाही. यामुळे गावात कुणाचा मृत्यू झाल्यास ओबडधोबड रस्त्याने अंत्ययात्रा काढून मृतकांवर शेतात उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. अशात पाऊस झाल्यास सरणावर पाणी पडून ते वारंवार विझत असल्याने मृत्यूनंतर मृतदेहांची यामुळे अवहेलना होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी नागरिक करित आहेत.

जनसुविधा योजनेतून स्मशानभूमींचा विकास करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. ज्या गावांमध्ये अद्याप स्मशानभूमी उभारण्यात आलेली नाही, अशा गावांमध्ये ही व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल.- आर.बी. शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यू