शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी अडवणूक का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:04 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील वडद व टाकळखोपा येथील अधिग्रहणाचा प्रस्ताव महिना ते दीड महिना प्रलंबित ठेवून सर्वसाधारण सभेत विषय निघाल्याच्या दुसऱ्या दिवशी मंजूर झाला. टंचाईच्या काळातही लोकांची अशी अडवणूक का केली जात आहे, असा सवाल शिवसेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील वडद व टाकळखोपा येथील अधिग्रहणाचा प्रस्ताव महिना ते दीड महिना प्रलंबित ठेवून सर्वसाधारण सभेत विषय निघाल्याच्या दुसऱ्या दिवशी मंजूर झाला. टंचाईच्या काळातही लोकांची अशी अडवणूक का केली जात आहे, असा सवाल शिवसेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे तर सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे, सुनंदा नाईक, रेणुका जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी आहेर म्हणाले, वडद व टाकळखोपा येथील प्रस्ताव रखडण्यामागे संयुक्त पाहणीचे कारण बीडीओंकडून सांगितले जात आहे. मग एकाच दिवसात ही पाणी कशी पूर्ण झाली? त्याअगोदर त्याला का मुहूर्त मिळत नव्हता? याला अडवणूक म्हणायचे नाही तर काय, असे सवाल करताच सगळे निरुत्तर झाले. यावेळी वसमत तालुक्यातील विहिरींचा प्रश्नही गाजला. सभापती प्रल्हाद राखोंडे व अंकुश आहेर यांनी यात प्रश्नांची सरबत्ती केली. ५९२ विहिरींना लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे मागच्या बैठकीत सांगितले होते. त्यांचा प्रस्ताव पाठविला तर त्यात अनेक त्रुटी आहेत. छाननी समितीने त्यामुळे मंजुरी दिली नाही. शिवाय तांत्रिक मान्यतेसाठीही कोणी तयार होत नाही. अनेकदा माणसे बदलली जात आहेत. ही कामे होवूच नयेत, याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर ही कामे करण्यासाठी गटविकास अधिकाºयांनी जातीने लक्ष घालण्याचा आदेश सीईओ तुम्मोड यांनी दिला. तर वित्त विभागातही जि.प.त हेडच नसलेल्या कामांचा ठराव घेण्याचा आग्रह धरला जात असल्याचा आरोप आहेर यांनी केला. जि.प.कडे लेखाशीर्ष नसलेल्या कामांसाठी जि.प. एक एजन्सी म्हणून काम करते. अशा कामांसाठी समितीत चर्चा, ठरावाची काय गरज, असा सवालही आहेर यांनी केला. कोणत्या नियमान्वये हे सांगितले जात असल्याची त्यांनी विचारणा केली. त्यावर वित्त अधिकारी डी.के.हिवाळे यांनी क.१00 अंतर्गत कामे आल्यास अशा कामांसाठी जिल्हा परिषदेत पुन्हा चर्चा करण्याची अथवा ठराव घेण्याची गरज नाही. मात्र क.१२३ अथवा इतर योजनांत अशा प्रकारचा ठराव घ्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकाºयांकडे गेल्यावर बराच वेळ वेटिंग करावी लागते. जि.प.सदस्य असल्याने इतर कामांच्या व्यापात वेळ नसल्याने जि.प.सदस्यांना भेट घेण्यास वेळ लागू नये, असा ठराव घेण्याची मागणी जि.प.सदस्य अजित मगर यांनी केली. मात्र इतर सदस्य व पदाधिकाºयांनी त्यांना समजावत त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून हा मुद्दा मांडू. अशा पद्धतीने ठराव घेणे योग्य वाटत नसल्याचे सांगितले. त्यानंतर मगर यांनी यावर पदाधिकाºयांनी त्यांच्याशी चर्चा करावी, वेळेत भेट झाली पाहिेजे, असे मत मांडले.जि.प.सदस्या सुवर्णमाला शिंदे यांनी वसमत तालुक्यातील कोठारी येथील प्रकरणात ग्रामसेवकावर कारवाई झाली. मात्र सरपंचावरील कारवाई का होत नाही, अशी विचारणा केली. त्यात प्रशासनातूनच परस्परविरोधी उत्तरे ऐकायला मिळाली.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाई