शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या आश्वासनांचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:25 IST

आ.तान्हाजी मुटकुळे यांनी त्यांचा संकल्प सिद्धी अहवाल प्रकाशित केला असला तरीही त्यात भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा लवलेशही नसून हा अहवाल एक दिशाभूल असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांनी पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आ.तान्हाजी मुटकुळे यांनी त्यांचा संकल्प सिद्धी अहवाल प्रकाशित केला असला तरीही त्यात भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा लवलेशही नसून हा अहवाल एक दिशाभूल असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांनी पत्रकार परिषदेत केला.मुनीर पटेल म्हणाले, यात आमदारांनी आपल्या निधीसह कयाधू नदीसंदर्भातील पत्रांचाच उहापोह केला. त्यांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आणले, ही बाब वगळली तर इतर सर्व पत्रव्यवहारच आहे. माजीमंत्री दांडेगावकर यांनी यापूर्वीच पाणी उपलब्धता आणली होती. मात्र त्यातून होणारी कामे पुढे भाजप सरकारने का केली नाही? असा सवालही केला. परंतु भाजपाने सत्तेत येण्यासाठी जी आश्वासने दिली होती, त्याची कुठेच या अहवालामध्ये पूर्तता झाल्याचे दिसत नाही. किंबहुना त्याचा साधा उल्लेखही नाही. मुळात हा अहवाल कोणत्याही गांभिर्याने केला नाही, हे दिसत आहे. त्यामुळेच त्यात एटीएम फोडून २0 लाख पळविल्याची असंबंध बातमीही आल्याचे ते म्हणाले. यावेळी बी.डी. बांगर यांनीही छत्रपतींचा पुतळा, नर्सी नामदेव येथील मंदिराच्या मुद्यावरून आ.मुटकुळे यांच्यावर टीका केली. लोकवर्गणीतील कामेही स्वत:च्या नावाने खपविण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.विरोधकांचे डोळे दिपले असतील-मुटकुळेमी माझ्या वैयक्तिक स्तरावर केलेल्या विकासकामांचाच आढावा दिलेला आहे. पक्षस्तरावरील आढावा पक्षाकडून दिला जाईल. कदाचित होत असलेली कामे व त्यातील निधीचे आकडे पाहून विरोधकांचे डोळे दिपत असतील. त्यामुळे असे दुधखुळे आरोप करून वेळ वाया घालविण्याची कामे ही मंडळी करीत आहे. या पोपटपंची करणाऱ्यांमागचा बोलवता धनी वेगळा असला पाहिजे. त्यांनीच थेट समोर आल्यास विकास की दिशाभूल हे सांगता येईल, अशी प्रतिक्रिया आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस