शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

२९ गावांत जलयुक्त ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:18 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी निवडलेल्या २९ गावांमध्ये अद्याप कामेच सुरू नाहीत. ३० गावात ३० टक्के कामे झालेली असून या गावात त्यापेक्षा कमी कामे झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी निवडलेल्या २९ गावांमध्ये अद्याप कामेच सुरू नाहीत. ३० गावात ३० टक्के कामे झालेली असून या गावात त्यापेक्षा कमी कामे झाली आहेत.जलयुक्त शिवार योजनेबाबत मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यंत्रणांना कडक सूचना देत कामांना गती देण्यास बजावले आहे. मात्र तरीही अनेक यंत्रणांची कामे धिम्या गतीनेच होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकूण ८० पैकी २९ गावांत अजून एकही काम हाती घेतलेले नाही. या योजनेत अवघा ३.८५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.चालू वर्षांत ढाळीच्या बांधाचे २३६ कामे प्रस्तावित असून १९६ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. १२ कामे सुरू झाली असून, ३८ लाख खर्ची पडले आहेत. सलग समतल चर (हेक्टर संख्या) १३ कामे प्रस्तावित असून ४ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. खोल सलग समतल चर २७५ कामे प्रस्तावित असून ६१ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. अनघड दगडी बांध २७, अर्दन स्ट्रक्चर १६, शेततळ्यांची ४५६ कामे प्रस्तावित असून १५५ निविदा पूर्ण झाल्या असून ९० कामे सुरू आहेत. तर ३ लाख खर्ची पडले आहेत. माती नाला बांध ११० कामे प्रस्तावित आहेत. साखळी सिमेंट बंधारा १८५ कामे प्रस्तावित असून ९ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. २ कामे सुरू असून ३ लाख खर्च झाले आहेत. नाला खोलीकरण/सरळीकरण २०१ कामे प्रस्तावित असून ९६ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. ४५ कामे सुरू असून ४३ लाख खर्च झाला आहे. रिचार्ज शाष्ट २६९ कामे प्रस्तावित आहेत. ठिबक सिंचन २१५ प्रस्तावित कामे असून ३७५ कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. १९५ कामांना सुरूवात झाली असून ७४ लाख खर्च झाले आहेत.तूषार सिंचन २१६ प्रस्तावित कामे असून ५७५ कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. २८८ कामांना सुरूवात झाली असून २९ लाख खर्च झाले आहेत. बंधारे ५०, रिचार्ज ट्रेंच १६, जुन्या सरंचना दुरूस्ती व तळ खो. ५४, नाला खो. रा. व सिएनबी २१ व इतर ३ प्रस्तावित कामांचा समावेश आहे.जलयुक्त शिवार योजनेत शासनाने नव्याने काही बदल केले आहेत. त्यानुसार आता माथा येथे पायथा अशी जल व मृदासंधारणाचे उपाय अनिवार्य केले आहेत. यापूर्वी या निकषांना तेवढे प्राधान्य दिले न गेल्याने अनेक ठिकाणी खालची कामे गाळल्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे अशा गावांना या कामांचा जास्त काळ फायदा होणे अवघड आहे. हे टाळण्यासाठीअधिकाºयांनी अधिक सूक्ष्म नियोजन करण्यास सांगितले आहे. त्या दृष्टीने विचार केला तर आता ही कामे सुरू होणे गरजेचे आहे. फेब्रुवारी महिना संपत आल्याने आता पावसाळ्यापूर्वी केवळ तीन उरले आहेत. त्यामुळे ८० गावे १०० टक्के कामे पूर्ण करून बाहेर काढण्याचे आव्हान आहे.