शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

हळदीवर पाणीटंचाई; हुमणी-करपाचेही संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:41 IST

तालुक्यात यावर्षी नवीन हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. पाणी टंचाईच्या मुख्य संकटासह हुमणी, करपाचे संकट हळदीवर असल्याने यावर्षी हळद उत्पादक चिंतेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यात यावर्षी नवीन हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. पाणी टंचाईच्या मुख्य संकटासह हुमणी, करपाचे संकट हळदीवर असल्याने यावर्षी हळद उत्पादक चिंतेत आहेत.वसमत तालुक्यातील मुख्य पीक असलेले हळद शेतकऱ्यांसाठी आधाराचे पीक ठरत आलेले आहे. राज्यात सर्वाधिक हळद पिकवणारा तालुका म्हणूनही वसमत प्रसिद्ध आहे. वसमतची उच्च दर्जाची हळद खरेदीसाठी राज्यभरातील हळद खरेदीदारांसह परप्रांतातील खरेदीदारही वसमत येथे येतात. वसमतच्या मोंढ्यात खरेदीदार मातब्बर उतरत असल्याने हळदीला दरही चांगला मिळतो. परिणामी शेतकरी हळद लागवडीवर भर देत गेले आहेत. मात्र आता पाणीटंचाईचे संकट समोर उभे राहीले आहे. गेल्या तीन वर्षांपासून धरण भरत नसल्याने हळदीला पाण्याचा फटका बसला आहे. ज्या शेतकºयांकडे पाण्याची व्यवस्था व हमखास पाणी आहे, असेच शेतकरी हळद लागवड करत आहेत.तालुक्यात यंदा १७ हजार ५०० हेक्टर हळद लागवड झालेली आहे. जूनमध्ये पावसाचा ताण पडला. पावसाळ्यातच पाण्याचा ताण पडल्याने इतर पिके वाºयावर सोडून शेतकºयांनी हळदीवर लक्ष केंद्रित केले. हळदीलाच पाणी वापरले. मात्र आता बोअर व विहिरींचेही पाणी कमी होत आहे. त्यामुळे हळदीवर चांगलाच ताण पडला आहे.अन् आता हळदीवर हुमणी व करपाचाही प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. हळदीवर पडलेल्या भुंग्यासाठी शेतकºयांनी एरंडीचे सापळेही लावले. रासायनिक औषधीही वापरली. या सर्व उपाययोजनांवर वेळ व पैसा खर्च झाला. आता हळदीवर काही भागात करपाही पहावयास मिळत आहे. या संकटावर मात करत आता हळदीला किती उतारा येतो, याची धास्ती शेतकºयांना आहे. वसमत तालुक्यातील गिरगाव, पार्डी, सोमठाणा, कुरूंदा, कौठा, किन्होळा, सातेफळ, हयातनगर, परजना आदी भाग हळदीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. इसापूरच्या लाभक्षेत्रात पाण्याचा आधार असल्याने हळद काही प्रमाणात तग धरून आहे. मात्र पूर्णा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात हळदीला संघर्ष करावा लागतो आहे. फेब्रुवारी मार्चपर्यंत नवीन हळद येते. आता हळद काढणीच्या कामाला वेग येण्याचे दिसत आहेत. मात्र हळदीची अवस्था शेतकºयांना अस्वस्थ करणारी आहे. हळदीचा उतारा घटेलच मात्र हळदीच्या दर्जावरही परिणाम झाल्यास परत दर कमी मिळण्याची भीती; त्यामुळे दुहेरी फटक्याची चिंताही व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी