शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

येत्या तीन दिवसांत वॉर्डचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:33 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर बनविलेल्या वॉर्डाची साफसफाई सुरु असून बुधवारपासून १ आणि ३ नंबर वार्ड तेथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने अनेक रुग्णांची होणारी गैरसोय आता दूर होण्यास मदत मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर बनविलेल्या वॉर्डाची साफसफाई सुरु असून बुधवारपासून १ आणि ३ नंबर वार्ड तेथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने अनेक रुग्णांची होणारी गैरसोय आता दूर होण्यास मदत मिळणार आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसºया मजल्याचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु होते. शिवाय, या ठिकाणी औषधीही रुग्णांना बाहेरुन आणावी लागत आहे. यासह अनेक अडचणींचा करावा लागणारा सामना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालयाची झाडाझडतीच घेतली होती. यात आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी ठरावीक कालावधीही ठरवून दिला होता. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे रेंगाळत चाललेल्या रुग्णालयाच्या इमारतीचे काम गतीने करण्यासाठी खडसावले होते. एवढेच काय तर शहर पोलीस ठाण्यात काम पूर्ण करण्याची तारीखही लिहून देण्यास सांगितले होते. त्यामुळे का होईना पण इमारतीचे जवळपास काम ९० टक्के झाले असल्याने आता रुग्णालय २०० बेडचे होणार आहे. रुग्णालयातील इतर प्रश्न सुटले असले तरीही अजून औषधीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव बाहेरुन औषधी आणण्यासाठी धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र अजूनही कायम आहे. मात्र वर्षानुवर्षाचा खाटेचा प्रश्न तरी सुटणार आहे. एका- एका खाटेवर दोन- दोन रुग्णांना उपचार घेण्याची वेळ तूर्तास टळण्यास मदत होणार आहे. प्रारंभी १ व ३ वॉर्ड हलविला जाणार आहे. तर डॉक्टरांचाही तपासणी कक्ष दुसºयाच मजल्यावर बनविण्यात आला आहे. मात्र येथे अजून लिफ्टची व्यवस्थाच करण्यात आलेली नसल्याने अपंग रुग्णांना पायºया चढता - चढता नाकीनऊ येण्याची शक्यता आहे. शिवाय औषधीसाठीही खालीच धाव घ्यावी लागणार आहे.समस्यांवर लक्ष : डायलिसिस वॉर्डही हलणारविविध समस्यांने जिल्हा सामान्य रुग्णालय चांगलेच चर्चेत आले आहे. त्यामुळे स्वत: जिल्हाधिकाºयांनी यात लक्ष घातले असल्याने, यंत्रणा समस्या सोडविण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र अधून - मधून काही केल्या येथील पाणी समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनापाण्यासाठी हॉटेलचा आधार घ्यावा लागतोे. तेथेही फुकट पाणी नसून काही पदार्थ खरेदी केले तर पाणी मिळते. याकडेही एकदा जिल्हाधिकाºयांनी लक्ष दिले तर तोदेखील प्रश्न मार्गी लागू शकतो, असे येथील पाण्यासाठी हैराण झालेले रुग्ण सांगत आहेत.रुग्णालयात उपचारासाठी येणाºया रुग्णांची गैरसोय होऊ न देण्याचा प्रयत्न रुग्णालयातर्फे सुरु आहे. तर पाण्याच्या समस्येकडे स्वत: लक्ष घालत असल्याचे अतिरिक्त शल्यचिकित्सक मंगेश टेहरे यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोलीdocterडॉक्टर