शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोत्रा येथे घरांच्या भिंती कोसळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:49 IST

कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे ४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या जीर्ण चार घरांची मागच्या बाजूची भिंत जमीनदोस्त झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याच भागात गुढ आवाजासह हादरे बसत असल्याने तर्कवितर्क लढविले जात असले तरीही काल मात्र अशा प्रकारचा कोणताच हादरा जाणवला नव्हता. .

लोकमत न्यूज नेटवर्कपोत्रा : कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे ४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या जीर्ण चार घरांची मागच्या बाजूची भिंत जमीनदोस्त झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याच भागात गुढ आवाजासह हादरे बसत असल्याने तर्कवितर्क लढविले जात असले तरीही काल मात्र अशा प्रकारचा कोणताच हादरा जाणवला नव्हता. .पोत्रा येथे रात्री १ वाजण्याच्या सुमारास नागरिक गाढ झोपेत असताना चार घरांच्या भिंती कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे गाढ झोपेत असलेले नागरिक जागे झाले. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. भिंती मागच्या बाजूने कलंडल्या. त्याामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरे उद्ध्वस्त झाल्याने गोर- गरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत. घर कोसळून टिनपत्राचा आवाज आल्याने भूकंपाचाच हादरा झाला की काय? असे लोकांना वाटू लागल्याने पळापळ झाली. पोत्रा गावापासून सात कि.मी. अंतरावरील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे परिसरात नेहमीच गुढ आवाज होऊन हादरे बसतात. त्यामुळे हा तोच प्रकार असल्याचा समज अनेकांना झाला. प्रत्यक्षात संबंधीत गावातील नागरिकांशी चर्चा केली असता वापटी, पांग्रा शिंदे येथे या क्षणी भुकंप झाला नसल्याचे नागरिकांकडून समजत आहे. मात्र घरांची पडझडीचे रहस्य अद्याप उलगडले नाही. पोत्रा येथील माधवराव ग्यानोजी गयाळ, शामराव कोंडबाराव बरगे, वसंतराव कोंडबाराव मुलगीर, लक्ष्मण माधवराव गयाळ यांची घरे जमीनदोस्त झाली. जवळील अनेक घरांना तडे गेले. रविवारी सुट्टी असल्याने प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी गावात आले नाही. तसेच ग्रामस्थांनीही कोणाशी संपर्क केला नसल्याचे सांगण्यात आले.