वसमत : तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासाठी ३५२ मतदान केंद्रांवर १ लाख ५४ हजार ९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
वसमत तालुक्यात १०६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पॅनल बनविणे, उमेदवार निश्चिती, तसेच विविध कागदपत्रे जुळवणीसाठी धांदलघाई सुरू असून, वातावरण तापले आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी झाली आहे. ३५२ मतदान केंद्रांची यादी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहे, तसेच १०६ ग्रामपंचायतींसाठी १ लाख ५४ हजार ९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ८० हजार ७२२ पुरुष, तर ७३ हजार ३७६ महिला मतदार आहेत. तालुक्यात निवडणुकीचा ज्वर चढला असून, सर्व पक्षांनी आपापल्या परीने तयारी केली आहे. पक्षापेक्षा गावातील राजकारणावर निवडणुकीचे रंग ठरणार असल्याने पॅनल बनवताना सर्वसमावेक्षक उमेदवार ठरवण्यावर भर दिला जात आहे.