शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात आंदोलनाला हिंसक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 01:26 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. शाळेच्या प्रांगणात असलेल्या मिनी स्कूल बससह एक खाजगी वाहन जाळण्यात आले. तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीचे गोदामही जाळले. शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. शाळेच्या प्रांगणात असलेल्या मिनी स्कूल बससह एक खाजगी वाहन जाळण्यात आले. तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीचे गोदामही जाळले. शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती.महाराष्ट्र बंदच्या काळात सेनगाव येथे आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. अज्ञात व्यक्तीने गुरुवारी रात्रीच्या सुमारास येथील तोष्णीवाल महाविद्यालयाचा प्रांगणात असलेल्या मिनी स्कूल बसला आग लावली. तर एका वाहनाची तोडफोड केली. दुपारी एकचा सुमारास आजेगाव रस्त्यावर एक खाजगी वाहनाला आग लावण्यात आली. ही जीप एका रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची असल्याचे सांगितले जाते. या प्रकारानंतर शहरात तणाव वाढला. आंदोलन चिघळल्याने पोलीस बंदोबस्तही वाढविला होता. या तणावाच्या परिस्थितीत आणखी भर पडली ती पं.स.चे गोदाम जाळण्याच्या घटनेची.दरम्यान, शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व दुकाने, शाळा, महाविद्यालयासह दवाखाने, मेडिकल, पेट्रोलपंप अशा अत्यावश्यक सेवासह शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका बंद होत्या. सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन स्थळापासून शहरातील प्रमुख मार्गाने रॅली काढून आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देण्यात आला. यावेळी मोठा जमाव एकत्र आला होता. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर दिवसभर रास्ता रोको केला. त्यामुळे तालुक्यातील प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रास्तारोकोसाठी हिंगोली, रिसोड, जिंतूरसह सर्वच रस्त्यावर झाडे तोडून टाकल्याने वाहतूक पूर्णत: बंद झाली होती.तालुक्यातील पानकनेरगाव, पुसेगाव, खुडज, भानखेडा, कौठा पाटी, साखरा आदी ठिकाणी रास्ता रोको, बंद पाळण्यात आले. तसेच दोन वाहने जाळण्यात आली.सेनगाव : सायंकाळी चारच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या गोदामाला आग लागली. या आगीत शेतीउपयोगी साहित्यासह जुन्या रेकॉर्डला आग लागली. सांयकाळी उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न चालू होते. वाहनांची जाळपोळ, तोडफोड यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लागले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने शहरात पोलिसांच्या वतीने विविध ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. परिस्थिती नियत्रंणात आणण्यासाठी दंगा नियत्रंण पथकास पाचारण केले होते. पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी येथे भेट दिली. आग लागलेल्या गोदामाची तहसीलदार वैशाली पाटील यांनी पाहणी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा