शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत प्रेमप्रकरणातून हिंसाचार; बारसमोर तरुणाचा खून, एकाची अवस्था गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 09:50 IST

हयातनगर फाट्यावर चाकू हल्ला : प्रेमप्रकरणातून युवकाचा खून प्रकरणात दोन आरोपी अटकेत

वसमत (जि. हिंगोली) – तालुक्यातील हयातनगर फाट्यावर मंगळवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. एका बारसमोर प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून तिघांनी दोघा तरुणांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विशाल मुंजाजी देवरे (वय २२, रा. थोरावा) याचा जागीच मृत्यू झाला, तर ओमकार देवीदास नरवाडे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.

ही घटना २४ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. हल्ला करणाऱ्यांमध्ये ऋषीकेश कदम (रा. सारोळा), गोपाळ रंगनाथ देवरे आणि शिवाजी देवरे (दोघे रा. थोरावा) यांचा समावेश आहे. तिघांनी चाकूने अचानक हल्ला करत विशाल आणि ओमकार यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात विशालच्या छातीत आणि पोटात गंभीर वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच हाटा पोलिस स्टेशनचे सपोनि संग्राम जाधव, पोलीस कर्मचारी कृष्णा चव्हाण, सम्राट कासले यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत तपास सुरु केला. याप्रकरणी मृत विशालचा भाऊ आदिनाथ देवरे यांनी हाटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे विकास पाटील, सपोनि शिवसांब घेवारे यांनी भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलीसांनी रात्री उशिरा अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास हाटा पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली