शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Video : पिस्तुलाच्या धाकावर रोख रक्कमेची बॅग पळवली; वसमत येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 17:01 IST

पाळत ठेऊन हा प्रकार झाल्याची संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे.

वसमत : येथील साई गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याला पिस्तूल दाखवून त्याच्या जवळील बॅग लांबविल्याची घटना घडली गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. भरदिवसा राष्ट्रीय महामार्गालगत हा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.

वसमत - नांदेड रोडवर असलेल्या साई गॅस एजनसीचे कर्मचारी गजानन डरंगे हे नेहमीप्रमाणे बँकेत पैसे भरण्यासाठी निघाले हाेते. कार्यालय रस्त्यावर अगोदरच थांबलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्यासमोर येत, एकाने पिस्तूल दाखवत डरंगे जवळील बॅगमध्ये असलेले ८६ हजार रूपये हिसकावून नांदेडच्या दिशेने पोबारा केला. भर दिवसा राष्ट्रीय महामार्गावर हा थरार घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष बाब अशी की, हा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सपोनी श्रीदेवी पाटील, पोलीस उपनिरीक्षक खार्डे यांच्यासह पथक दाखल झाले. आरोपींच्या शोधात पथक पाठवण्यात आले आहे. पाळत ठेऊन हा प्रकार झाल्याची संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. आठ दिवसात दुसऱ्यादा बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याची घटना आहे. यापूर्वी २६ जुलै रोजी वसमत- औंढा रस्त्यावरील चोंडी फाट्या जवळील पेट्रोल पंपाजवळ पंप चालकाला बंदुकीचा धाक दाखवून ८ हजार रुपये लंपास केले हाेते. याघटनेचे गांभीर्य घेतले गेले नसल्याने वसमत शहरात गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. त्यातून गुन्हेगारांची हिंमत वाढत असल्याचाच हा प्रकार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीPoliceपोलिस