शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Video: भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींनी वेळ काढला...थेट कुस्तीच्या आखाड्यात

By सुमेध उघडे | Updated: November 12, 2022 15:23 IST

कोल्हापूर येथून माजी मंत्री सतेज पाटील यांचे दहा हजारांवर समर्थक पहाटे आखाडा बाळापूर येथे दाखल झाले.

हिंगोली: खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात आजचा दुसरा दिवस आहे. सकाळी कोल्हापूर येथून माजी मंत्री सतेज पाटील यांचे फेटेधारी दहा हजार समर्थक सामील होताच यात्रेचे चित्रच पालटलं. याचवेळी थोडावेळ काढून राहुल गांधी थेट आखाड्यात पोहचले. येथे कोल्हापूरच्या पहेलवानांची दंगल पाहत खा. राहुल यांनी कुस्तीचे डावपेच जाणून घेतले.

भारत जोडो यात्रेत देशभरातील नागरिक आपला सहभाग नोंदवत आहेत. राज्यात नांदेड येथून दाखल झालेली यात्रा सध्या हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातून कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते यात्रेत दाखल होत आहेत. कोल्हापूर येथून माजी मंत्री सतेज पाटील यांचे दहा हजारांवर समर्थक पहाटे आखाडा बाळापूर येथे दाखल झाले. या सर्वांनी कोल्हापुरी फेटा बांधून सहभाग घेतल्याने यात्रेचे चित्रच पालटले. यावेळी लेझिमचा खेळही होता. मराठमोळ्या पद्धतीने राहल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. त्यांना कोल्हापुरी फेटा बांधण्यात आला. राहुल गांधी यांच्या भारत जोडोच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील प्रमुख खेळ असलेली मातीतील कुस्ती खा. राहुल गांधी यांच्यासमोर प्रदर्शित व्हावी, अशी आमची इच्छा होती. ती राहुल गांधी यांनी पूर्ण केली. त्यांनी ही कुस्ती पाहिली. त्यात मॅटवरील कुस्ती व मातीतील कुस्तीतील फरक काय? या मल्लांचे वजन किती, नियमवली काय आदी बाबी त्यांनी जाणून घेतल्या. त्यांना या खेळाबद्दलचे कुतुहल पाहून आम्हाला आनंद झाला, अशा भावना यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांनी दिली. 

भारत जोडो यात्रेत १० हजारांवर कोल्हापुरी फेटेधारी सामीलभारत जोडो यात्रेत माजी मंत्री सतेज पाटील यांच्या दहा हजारांवर समर्थकांनी आखाडा बाळापूर येथील सकाळच्या सत्रात फेटे बांधून सहभाग नोंदविला. नफरत छोडो , भारत जोडो अशा घोषणा देत ही मंडळी सहभागी झाली होती. खा. राहुल गांधी साडे सहाच्या सुमारास यात्रेत सहभागी होण्यासाठी आल्यानंतर तेथे हे फेटेधारी कोल्हापूरकर स्वागतासाठी सज्ज होते. गुलाबी थंडीत सकाळच्या वेळी रस्त्यावर दुतर्फा यांची भली मोठी रांग पहायला मिळाली. तर आमच ठरलय असे बॅनर्सही त्यांच्या हातात झळकत होते. बसमधून ही मंडळी भल्या पहाटेच येथे दाखल झाली होती. त्यानंतर तेथे सर्वांना फेटे बांधण्यात आले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राHingoliहिंगोली